Breaking News

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 07-07-2017 | 08:41:09 pm
  • 5 comments

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक

विम्याचे प्रस्ताव  सादर करण्याचे आवाहन

             जालना : शासन निर्णयानुसार राज्यात खरीप हंगाम २०१७ पासून व्यापक स्वरुपातील प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येणार आहे. सदरची योजना जालना जिल्हयातील खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, भुईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांसाठी राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै अशी आहे. योजनेची वैशिष्टये नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषि क्षेत्राच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित  ठेवण्यात आला आहे. जोखिमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून ) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्या खालीलप्रमाणे आहेत.

            पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्री वादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे होणारे नुकसान. काढणी पश्चात नुकसान. स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.  खरीप 2017 पासून सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत, पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती सोबत खालील पैकी कोणतेही एक फोटो  ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडीटकार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.

            पिकवार प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम पिकाचे नांव खरीप ज्वारी विमा संरक्षित रक्कम २४ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ४८०, बाजरी विमा संरक्षित रक्कम २० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ४००/-, मका विमा संरक्षित रक्कम २५ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ५००/-, तूर विमा संरक्षित रक्कम २० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ६००/-,  मुग विमा संरक्षित रक्कम १८ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ३६०, उडीद विमा संरक्षित रक्कम १८ हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम ३६० भुईमुग विमा संरक्षित रक्कम ३० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम सहाशे सोयाबीन विमा संरक्षित रक्कम ४० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम आठशे, कापूस विमा संरक्षित रक्कम ४० हजार शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रक्कम २ हजार/-  खरीप हंगाममध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे. त्वरीत नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रीया पूर्ण करावी. आपले सरकार सेवा केंद्रात प्रधानमंत्री पिक विमा याजनेचे अर्ज भरता येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Best Reader's Review