Breaking News

नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 27-06-2017 | 07:49:19 pm
  • 5 comments

नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर

धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास
लोहा :
हाकेतून हद्दपास होतेय आई...
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई....
हरवत चाललय किराणा आणि भुसार ....
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर ...

या महानगरी सामाजिक स्थितीचे चित्रण. विविध बोली भाषांची ओळख नांदेड जिल्ह्याचे  भूमीपूत्र मधुकर धर्मापुरीकर यांची हास्य चित्रातील मुल व्यगं चित्र लेखन क्षमता व अभिव्यक्ती विकास करण्यासाठी विविध कृती व नमुने  पुरक माहितीसाठी संदर्भग्रंथ सूची व संकेतस्थळांची माहिती असा शब्द वैभावाचा विविधांगी आणि नवनिर्मितीचा आनंद घेता येईल असे इयता नववीचे मराठी कुमारभारती पाठ्यापुस्तक विद्यार्थ्याच्या कल्पकतेला विचारांना चालना देणारे आहे.
इयत्ता नववी चा अभ्यासक्रम बदलला संपूर्ण विषयाचा नवीन पाठ्याक्रम विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेला कल्पकतेला वाव देणारा आहे. मराठी (इयत्ता ९ वी) च्या पाठ्यपुस्तकात नांदेड जिल्ह्याचे भूमीपूत्र प्रसिद्ध व्यंगचित्राचे अंभ्यासक संग्राहक मधुकर धर्मापूरीकर  (धर्मापुरी ता.लोहा) यांच्या हास्यचित्र-व्यंगचित्रे यातील भेदाभेद दर्शविणारा चित्र दुनियेची सफर घडवून आणारा हस्याचित्रांचा समावेश झाला आहे. ग.दि. माडगुळकराची वंदय-वंन्दे मातरम संत जनाबाई यांची धरिला पंढरीचा चोर म्हाइंभट याचा कीती कठीयाचा दृष्टांत मीरा शिंदे यांची नात्याची घट्टवीण हे पाठ आहेत. प्रसिद्ध संपादक लेखक उत्तम कांबळे यांच्या एक होती समई या पाठाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध पत्रकार ग्रामीण लेखक आसाराम लोमटे यांचा इयत्ता दहावीला पाठ आहे. राजीव बर्बे यांचा दुपार डॉ.यशवंत पाटणे यांचा डॉ विश्वेश्रय्या यांचा परिचय करून देणारा धडा आला आहे. 
हाकेतून हद्दपार होतेय आई,
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
 पोरं आता दंग असतात
दूरदर्शनच्या चॅनेलवर बघत क्रिकेटचा मॅच... हे महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे सामाजिक स्थितीचे चित्रण कवी सतीश कळसेकर  यांच्या मी वाचतोय या कवितेत झाले आहे. १९८४  ला इयत्ता ६ वीच्या मराठी पुस्तकात संत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या, 
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली 
ती सर्वप्राप्त झाली या झोपडीत माझ्या  ही कविता होती त्याच्या ९ वी च्या पाठ्यपुस्कात पुन्हा समावेश केला आहे.  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची' महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया'
ही लोकभाषेतील महाराष्ट्रावरील  त्यांचे प्रेम व्यक्त होते.
विविध बोली भाषांची ओळख नांदेड जिल्ह्याचे  भूमीपूत्र मधुकर धर्मापुरीकर यांची हास्य चित्रातील मुल व्यगं चित्र लेखन क्षमता व अभिव्यक्ती विकास करण्यासाठी विविध कृती व नमुने  पुरक माहितीसाठी संदर्भग्रंथ सूची व संकेतस्थळांची माहिती असा शब्द वैभावाचा विविधांगी आणि नवनिर्मितीचा आनंद घेता येईल असे इयता नववीचे मराठी कुमारभारती पाठ्यापुस्तक विद्यार्थ्याच्या कल्पकतेला विचारांना चालना देणारे आहे.
इयत्ता नववी चा अभ्यासक्रम बदलला संपूर्ण विषयाचा नवीन पाठ्याक्रम विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेला कल्पकतेला वाव देणारा आहे. मराठी (इयत्ता ९ वी) च्या पाठ्यपुस्तकात नांदेड जिल्ह्याचे भूमीपूत्र प्रसिद्ध व्यंगचित्राचे अंभ्यासक संग्राहक मधुकर धर्मापुरीकर (धर्मापुरी ता.लोहा) यांच्या हास्यचित्र-व्यंगचित्रे यातील भेदाभेद दर्शविणारा चित्र दुनियेची सफर घडवून आणारा हस्याचित्रांचा समावेश झाला आहे.
ग.दि. माडगुळकराची वंदय-वंन्दे मातरम संत जनाबाई यांची धरिला पंढरीचा चोर म्हाइंभट याचा कीती कठीयाचा दृष्टांत मीरा शिंदे यांची नात्याची घट्टवीण हे पाठ आहेत. प्रसिद्ध संपादक लेखक उत्तम कांबळे यांच्या एक होती समई या पाठाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध पत्रकार ग्रामीण लेखक आसाराम लोमटे यांचा इयत्ता दहावीला पाठ आहे. राजीव बर्बे यांचा दुपार डॉ.यशवंत पाटणे यांचा डॉ विश्वेश्रय्या यांचा परिचय करून देणारा धडा आला आहे. 

   दैनंदिन जीवनात वागतांना कवी संदीप खरे यांनी आपुले जगणे...

   आपुली ओळख! यात  उपरे अर्धे जोडू नका
   दिवा होऊ नि उजळ जगाला... चाकू होऊन कापू नको
   नित्यघडावे वाचन. ....लेखन
   क्षण कार्याविणा दवडू नको
   जेथे वाटा-तेथे काटा उगा
   भेदरून अडूनको
   करता हिंमत- जगता किंमत।
   भेकड गुळमूळ रडू नको!
असे जगण्यावर भाष्य केले आहे.  
चार्ली यांच्यावरील भा.द. खेरे यांचा 'हसरे दुःख 'हा पाठ तर १९८४  च्या इयता सातवीच्या मराठी बालभारती पुस्तकात 'ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ' हा पाठ होता तो नव्याने या पाठ्याक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
      साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांच्यामुळे नांदेड. लोहा भागाला परिचित झालेले आदिवाशी. डोंगराळ जीवनाशी एकरूप असलेले ग्रामीण कवी तुकाराम धांडे यांच्या' वनवासी 'कवितेचा समावेश आहे. सातवीच्या बदलेल्या पुस्तकातील पदमा गोळे यांची 'निरोप 'कविता पुन्हा आली आहे.
     कातकरी व पावरी बोली भाषाचा अभ्यास. कथालेख जाहीरात. मुलाखत संवाद लेखन वृंत्तात लेखन हे नमुनासह लेखन कौशल्य विकसित व्हावे म्हणुन पाठयाक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहे. पुरक संदर्भ ग्रंथ संकेतस्थळ देण्यात आले आहेत अतिशय सुंदर कलानिष्ठ विचाराला वाव देणारे पाठ्यपुस्तक आहे.
   राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे, डॉ. माधव बसवंते, देविदास तारू हे मराठी अभ्यास गट सदस्य आहेत. पदमाकर कुलकर्णी लोह्याच्या जि.प. हायस्कुल शाळेतील कृतिशील उपक्रमशील शिक्षक रवींद्र पांडागळे याचाही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात समावेश आहे. वेगवेगळ्या केशभुषा सचित्र व विश्वकोषाची ओळख यांचा अभ्यास आनंददायी करणारा आहे. पुस्तक सचित्र असल्यामुळे आकर्षक झाले आहे.

Best Reader's Review