Breaking News
महादेव कोळी व इतर आदिवासी जमातीचे दस्तावेज केंद्रीय आयोगाकडे
- Post By आज दिनांक वेब टीम | Tue 09-05-2017 | 12:48:48 pm
- 5 comments

महादेव कोळी व इतर आदिवासी
जमातीचे दस्तावेज केंद्रीय आयोगाकडे
न्यायालयीन बाजूसाठी ऐतिहासिक पुरावे संकलित
लोहा : मराठवाडयातील महादेव कोळी, मल्हार कोळी या आदिवाशी जमाती च्या अस्तीतवावर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या प्रशासकीय आणि अन्य जमातीच्या निराधार आरोपाना कायद्याने आव्हान देत स्वातंत्र पूर्व कालीन ब्रिटिश राजवटीतील न्यायालयीन दस्ताऐवज ऐतिहासीक पुरावे ,जनगणना अशी अत्यंत दुर्मिळ पुराव्यासह राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व दिल्ली स्थित केंद्रीय आदिवासी मंत्रालयाकडे दिड हजार पानाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्याची राज्य आयोगाने दखल घेतली आहे साठी न्यायालयीन लढाई साठी संपूर्ण मराठवाड्यातील या आदिवासी जमाती मध्ये जनचळवळ उभी करण्याचे काम सुरु आहे.या दस्ताएवजा मुळे विरोधाची धार बोथट होईल असा दावा याचिकाकत्यांनी केला आहे
मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने त्या दोन्ही जमातीच्या बाजूने असलेले १९५० पूर्वीचे शासकीय दस्तावेज ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ व त्या पुराव्याआधारे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि केंद्रीय आदिवासी मंत्रालय दिल्ली कडे दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सन १९५० पूर्वी अस्तित्वात असलेलेल्या निजाम राज्यातील ( आजचा मराठवाडा ) महादेव कोळी व मल्हार कोळी या दोन जमातीबाबतीत टी.आर.टी.आय. पुणेच्या आयुक्त / संचालक यांनी संशोधन न करता त्या पदावर काम करताना डॉ. गोविंद गारे, संभाजी सरकुंडे यांनी या दोन्ही जमातीच्या अस्तित्वा बाबतीत वारंवार प्रश्न चिन्ह निर्माण करुन, प्रशासनात या जमाती बद्दल साशंकता निर्माण केली या जमातीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत या दोन्ही जमातीला ७० वर्ष सवलती पासून वंचित ठेवण्याचे कट कारस्थान केले. त्या मुळे या षढयंत्राच्या विरोधात मराठवाड्यात फक्त महादेव कोळी व मल्हार कोळी या दोनच जमाती फार पुर्वी पासून वास्तव्यास असल्याचा दावा करणारी तक्रार ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, भारतीय राज पत्र व १९५० पूर्वीच्या जणगणनेचे अहवाल या शासकीय कागद पत्राच्या आधारे भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग एन.एच.आर.सी. व केंद्रीय आदिवासी मंत्रालय दिल्ली कडे दाखल केली आहे. या तक्रारीची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार वर्ग केली आहे. त्यामुळे गेली ७० वर्ष अन्यायाने त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीचे लक्ष राज्य मानवी हक्क आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.
या तक्रारी मध्ये तक्रारदार ए.स.रेजीतवाड यांनी मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी या जमातीचा दावा करताना महादेव कोळी जमातीचा पहिला संशोधक
१) ब्रिटीश राजवटीतील कॅप्टन मॅकिन्टोस दवारा लिखीत, २)जॉन विल्सन लिखित कुली – अबोरिजन ऑ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी, ३) निजाम कालीन जज सर सय्यद उल हसन लिखित द कॉस्ट अॅन्ड ट्राईल्स ऑफ एच इ एच दी निझाम डोमिनेशन, ४) आर.ई. इथोवेंस लिखित दी ट्राईल्स अॅन्ड कॉस्ट ऑफ बॉम्बे प्रिसिडेन्सी
५)आर रसेल्स लिखित दी कॉस्ट अॅन्ड ट्राईल्स ऑफ सेंटर प्रोव्हिनल्सान १९१६
६) र.मु.जोशी द्वारा लिखित हैदराबादाचे लोक १९५३ ७) सन १९५० पूर्वीच्या सर्व जनगणना अहवाल. ८)१९५० पूर्वीचे महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातील सर्व राजपत्र
या ऐतिहासिक व शासकीय संदर्भ ग्रंथांचा आधारे घेत मराठवाडा हेच महादेव कोळी जमातीचे मूळ वस्तीस्थान असल्याचा दावा केला आहे. या भागात महादेव कोळी व मल्हार कोळी या दोनच जमाती आढळतात असा दावा पुरावे आधारे केला आहे. त्यांनी या तक्रारीत टी.आर.टी.आय पुणेचे आयुक्त डॉ. गोविंद गारे लिखित The Tribes Of Maharashtra हा शासकीय संदर्भ ग्रंथ व २४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णया वर आक्षेप घेत ते रद्द करण्याची मागणी केली आहे.
२०११-१२ नंतर टी.आर.टी.आय पुणेचे आयुक्त संभाजी सरकुंडे व किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या दोन्ही अधिका-यांनी शासनास सादर केलेल्या दोन्ही स्वतंत्र अहवालावर आक्षेप घेतला आहे. सदरील अहवाल सन १९६१ च्या पुढील जनगणनेचा व शासकीय राजपत्राचा संदर्भ देत सादर केला. पण सन १९५० पूर्वीच्या कोणत्याही प्रकारच्या शासकीय संदर्भ ग्रंथ व कागदपत्रांचा पुरावा म्हणून आधार घेतला नाही. सर्व सामान्य जमातीस जातीचा दावा सिद्ध करताना१९५० पूर्वीचा पूरावा मागितला जातो तर सनदी अधिकारी यांनी आपले अहवाल सादर करतेवेळेस १९५० पूर्वीचे पुरावे का घेतले नाहीत असा खडा सवाल उपस्थित केला आहे. शासनास चुकीचा अहवाल सादर करुन मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी या जमातीस संविधानिक संरक्षक तरतुदी पासून वंचित ठेवणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी तक्रारी द्वारे केली आहे.
यासाठी मराठवाडयातील वेगवेगळ्या भागात महादेव कोळी,मल्हार कोळी व तत्सम आदिवासी जामती च्या समुहात गेल्या चार पाच माहिन्या पासून जन जागृती केली जात आहे . श्री कोळी यांच्यासह काही तरुण कार्यकत्यानी तन मन धनाने झोकेन देऊन काम हाती घेतले आहे काही होतकरु तारुणानी संशोधन करत हे ऐतिहासिक दस्ताऐवज गोळा केले आहेत ज्यामुळे न्यायालयात बाजू अधिक भक्कम होणार आहे.
महादेव कोळी, मल्हार कोळी या जमातीना संविधान संरक्षक तरतुदी पासून वंचित ठेवले अशी तक्रार अजीत रेजितवाड यानी केली आहे 'आदिम"चे रमेश पिठठलवाड, गणेश सूर्यवंशी, निवृत्ती रेकडगेवार, रामचंद्र बोईवाड यानी पाठपुरावा सुरु केला आहे