Breaking News

भोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक निलंबीत

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 02-04-2017 | 08:33:25 pm
  • 5 comments

भोकरदनच्या तहसीलदार

रूपा चित्रक निलंबीत

विभागीय आयुक्तांची मराठवाड्यात सलग दुसरी कारवाई

भोकरदन : भोकरदनच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी भोकरदन तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला लाखो रूपये घेऊन खतपाणी घातल्याबद्दल, तसेच वाळू व्यवसायात त्यांची भागीदारी असल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी त्यांचे निलंबन केले. याआधी नांदेड जि.प.चे अतिरिक्त सीईओ पी.डी. केंद्रे यांनाही कामाच्या अनियमतेचा ठपका ठेवून सेवानिवृत्तीच्या दिवशीच निलंबीत केले होते. लागोपाठच्या कारवाईने शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदार रूपा चित्रक या पाणीटंचाईसंदर्भात दौरा करीत असताना लतिफपूर येथे त्यांना ६०० ब्रास वाळू साठा आढळून आला. तर खडकी येथील गायरानात ५ हजार ब्रास वाळू साठा आढळून आला. या दोन्ही ठिकाणी अनधिकृत साठे जमा करून दररोज शेकडो ट्रकद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. या वाळू साठ्यास तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हसनाबाद हे नियमित भेटी देतात. परंतु वाळू वाहतूकदारांकडून लाखो रूपये घेत असल्याचे सरपंच व इतर नागरिकांनी पंचनाम्याच्या वेळी सांगितले. तसेच तहसीलदार चित्रक यांची नरवडे बिल्डर्ससोबत भागीदारी असून, त्यांचे टिप्पर चालू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याशिवाय तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. तसेच वाळूघाटांना ते शासकीय कर्मचाऱ्यांसोबत न जाता अशासकीय लोकांना सोबत घेऊन भेटी देतात व वाहनधारकांकडून पैसे घेऊन मोकळीक देतात. असे अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवून विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

………………….

Best Reader's Review