Breaking News

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले, आरोपी पसार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 04-02-2020 | 12:01:08 am
  • 5 comments

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले, आरोपी पसार

वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आज सकाळी साडे सात वाजता ओरोपी विकेश नगराळे यानं या शिक्षिकेला पेटवून दिलं. आरोपी हा घटनास्थळाहून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असून त्यातूनच तिला जाळण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली आहे. यामध्ये तरुणी 20 ते 30 टक्के भाजली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले यात ही ३० वर्षीय शिक्षिका २० ते ३० टक्के भाजली आहे. त्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयातून नागपूरकडे रवाना करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील 2 तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पीडितेला वाचवलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

Best Reader's Review