कास्टिंग काऊचमधून महिला खासदारही सुटल्या नाहीत: रेणुका चौधरी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 25-04-2018 | 01:30:01 am
  • 5 comments

कास्टिंग काऊचमधून महिला खासदारही

सुटल्या नाहीत: रेणुका चौधरी

नवी दिल्ली: कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण प्रतिक्रिया आली आहे ती म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्या   रेणुका चौधरी यांची.

“कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असे रेणुका चौधरी म्हणाल्या.

दरम्यान, या पूर्वी सरोज खान यांनी “हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी देते, बलात्कार करुन सोडून देत नाही हे मुलीवर आहे की, तिला काय करायचंय. तिला त्याच्या हाती लागायचं नाही तर नाही येणार. तिच्याकडे कला आहे तर तिने स्वत:ला का विकावं? फिल्म इंडस्ट्रीला काही बोलू नका, ती आमची आई-बाप आहे.”असे म्हटले होते.

Best Reader's Review