Breaking News

रेश्मा राजन शेट्ये प्रकरणात बांधकाम विभागाचे अभिप्राय घेण्याचे विद्या ठाकूर यांचे निर्देश

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 11-04-2018 | 12:24:01 am
  • 5 comments

रेश्मा शेट्ये प्रकरणात बांधकाम विभागाचे

अभिप्राय घेण्याचे विद्या ठाकूर यांचे निर्देश

मंत्रालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन

मुंबई, दि. १० : रेश्मा राजन शेट्ये यांच्या प्रकरणासंदर्भातील पुढील सुनावणी करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी राज्य महिला आयोगाचे सदस्यांना दिले. 

 
राज्यातील महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आज मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बृहन्मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अर्चना त्यागी शर्मा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, श्रीमती रेश्मा राजन शेट्ये यांनी महिला आयोगाकडे त्यांच्या प्रकरणाबाबत सविस्तर तक्रार करण्यापूर्वी पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे. त्यामुळे या तक्रारीसंदर्भात सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशन यांनी केलेली कार्यवाही तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभिप्राय घेणे आवश्यक आहे. या तक्रारीसंदर्भात सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतरच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Best Reader's Review