Breaking News

नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 03-02-2020 | 11:21:03 pm
  • 5 comments

नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध”ला

सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार

मुंबई, 3 फेब्रुवारी 2020

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख पुरस्कार या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या फिल्म्स डिव्हिजन येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज वरळी इथल्या नेहरु सेंटर सभागृहात झाला. ‘पिस्तुल्या’नंतर नागराज मंजुळे याचा हा दुसरा लघुपट आहे.पावसाकडे बघण्याची वेगळी दृष्टी ते आपल्याला या लघुपटातून देतात.

“पिस्तुल्या” या लघुपटापासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नागराज मंजुळे यांचे फॅन्ड्री आणि सैराट हे चित्रपट प्रचंड गाजले. वास्तववादी विषय निवडून त्यांचे तितकेच वास्तववादी चित्रण भेदकपणे मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीचा परीघ आणि खोली दोन्ही विस्तारला आहे. मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या “पावसाचा निबंध” यातून पावसासोबत येणारे वादळ त्यांनी परिणामकारक दाखवले आहे. सशक्त व्यक्तिरेखा उभ्या करण्यात नागराज मंजुळे यांचा हातखंडा असून तशाच व्यक्तिरेखा या लघुपटातही आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा पहिला लघुपट ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या आधी अनेक महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला आहे.

 

Best Reader's Review