Breaking News

जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या स्वछंद कवितांनी रंगला “आयुष्यावर बोलू काही“

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-09-2019 | 09:51:17 pm
  • 5 comments

जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या स्वछंद 

कवितांनी रंगला आयुष्यावर बोलू काही

औरंगाबाद, दि.८

आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या स्वछंद कविता सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमानाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी "आयुष्यावर बोलु काही" हा बहारदार कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरात सादर केला. जिल्हा गणेश महासंघ, उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन औरंगाबाद हुंहे अन्वेषण विभागाच्या अधिक्षीका लता फड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, प्रभाकर विधाते, कार्याध्यक्ष अनिकेत पवार, मिथुन व्यास, संदीप शेळके, आदींची उपस्थिती होती. दमलेल्या बाबांची कहाणी सांगत संदीप खरे यांच्या कवितांना सलील कुलकर्णी यांनी स्वर साज चढवत रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. अग्गोबाई ढग्गोबाई या कवितांवर लहान मुलामुलींनी ठेका धरत उपस्तित पालकांचे लक्ष वेधले. जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही...चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही....गाडी सुटली रुमाल हलले, क्षण साधाया हसरे झाले... कसे सरतील सये तुझ्याविना दिस माझे...अशा विविध कवितांना सादर करून कवी संदीप कुलकर्णी आणि गायक सलील कुलकर्णी यांनी रसिकावर मोहिनी घातली. कार्यक्रमात प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या आग्रहाने जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनीही माऊली माऊली हे गीत सादर करून उपस्तित गणेश भक्तांना आपल्या रसिकपणाची ओळख करून दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा गणेश महासंघ, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केले. तर सूत्रसंचालन महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल पाध्ये, भास्कर निकाळजे, मनोज गायके, संदीप सपकाळ, प्रशांत तुपे, सोनू कोलते, शेखर जाधव, अक्षय दाभाडे, संजय वरकड, परमेश्वर घावट, मोहित श्रीवास्तव, गणेश तेलुरे, अमोल पाटील, मयूर खरे, अमोल पवार, प्रांतोष वाघमारे, विजय शिंदे, नितीन सुरडकर, दिलीप मुळे, निलेश कर्डीले, विजय बिडबे, योगेश हिवराळे, चेतन शिंदे, तिलक भुरीवाले, संभाजी सोनवणे, शेखर पेरकर, अमोल जंजाळ, सोमनाथ मगर यांनी पुढाकार घेतला.

 

Best Reader's Review