प्रायोगिक रंगभूमीची वास्तू राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल - विनोद तावडे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 16-06-2019 | 01:39:44 pm
  • 5 comments

प्रायोगिक रंगभूमीची वास्तू राज्य

शासनामार्फत उभारण्यात येईल - विनोद तावडे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार प्रदान
मुंबई दि. 15: राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा काल संध्याकाळी यशवंत नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती दया डोंगरे यांना जाहीर झाला होता. प्रकृती कारणास्तव ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि अखिल भारतील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. तावडे या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक नाडकर्णी यांच्या नाट्य समीक्षेने खऱ्या अर्थाने मराठी नाट्यरसिक नाट्यगृहांकडे वळला. मराठी नाटकांची वृत्तपत्रामध्ये अतिशय समर्पक वस्तुनिष्ठ व सडेतोड नाट्य समीक्षेमुळे मराठी रसिकांना मराठी नाटक कळू लागले.
 
 

Best Reader's Review