जनधन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 05-12-2016 | 12:25:23 pm
  • 5 comments


नोटबंदीने देशाचे चित्र पालटले आणि भविष्यही उज्वल होईल याची शाश्वती निर्मान झाली .त्रास होतोय पण ,निर्णय चांगला आहे.या सर्वसाधारण प्रतिक्रिया आहेत, या परिस्थितीत आपला विरोध उठून दिसला पाहिजे यासाठी विरोधकांचा आक्रोश सुरु आहे.पण हा आक्रोश त्यांच्या पुरताच मर्यादित असल्याची परिस्थिती आहे. नोटबंदीची किमया आताशा दिसून येऊ लागली आहे. सत्ता स्थापने नंतर पंतप्रधान मोदींनी देशातील सामान्य जनतेचे खाते बॅंकेत उघडण्याची मोहीम सुरु केली.त्यावेळी हा काय प्रकार असेच वाटत होते.परंतु मोदींचा हा निर्णय किती दूरदर्शी होता हे आता एव्हाना सर्वानाच पटले असावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणून भारतातील गरिबांच्या खात्यात पंधरा- पंधरा लाख रुपये जमा करू असे आश्वासन दिल्याच्या वलग्ना विरोधानी केल्या.सामन्यांमध्ये सरकारची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही.उलट पक्षी या आणि अश्या मुद्यांचा वापर विरोधकांनी सरकार विरोधातील भांडवल म्हणूनच केला आहे.विरोधकांजवळील हे भांडवल आता संपत चालले आहे.मुद्धेच नाहीत म्हणून विरोधासाठी विरोध करनाऱ्या विरोधकांची एकी आता संपत चालली आहे. विरोधक सैर- भैर आहेत आणि त्यातून ते मोदींवर बेछूट आरोप करीत आहेत. याचा प्रत्यय ममता बॅनर्जी यांच्या अनेक विधानातून येतो. एकूणच काय तर विरोधकांची अवस्था कधीनव्हे एव्हढी वाईट झाली आहे. दुसरीकडे मोदींनी आपला निर्णय किती चांगला आहे हे देशाला पटवून दिले आहे.देशभराती बॅंकांमध्ये पैसा ठेवायला जागा नाही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एव्हढा पैसा बॅंकांमध्ये आला आहे . मागे उघडलेल्या जणधन खात्यात आज तब्बल बहात्तर हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. काळा पैसा पांढरा करण्याच्या नादात अनेकांनी जनधन खात्यात खाते धारकांना आमिष दाखवून पैसा भरला आता हा पैसा त्याच खातेधारकांचा आसेल असे सूचक वक्तव्य पंतप्रधानांनी केले आहे यातच सर्व काही आले.

Best Reader's Review