Breaking News

बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर, ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोकऱ्या

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:04:45 am
  • 5 comments

बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर

‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोक-या

नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे.

Best Reader's Review