Breaking News

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अनुदीप दृशेट्टी पहिला

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 07-05-2018 | 12:27:50 am
  • 5 comments

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी

सेवा परीक्षेत अनुदीप दृशेट्टी पहिला

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१७ साली घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात अनुदीप दृशेट्टीने पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण २०२५ गुणांपैकी ११२६ गुण मिळवत ५५.६०% आकडेवारी गाठली आहे. यात ९५० लेखी परीक्षेत तर १७६ मुलाखतीत हे गुण मिळालेले आहेत.
 
या परीक्षेत अनु कुमारीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला लेखी परीक्षेत ९३७ तर मुलाखतीत १८७ गुण मिळाले असून एकूण ११२४ गुण मिळविण्यात यश आले आहे. यात तृतीय क्रमांक पटकावलेला सचिन गुप्ता याला ११२२ एवढे एकूण गुण मिळाले आहेत. लेखी परीक्षेत ९४६ तर मुलाखतीत १७६ अशी गुणसंख्या आहे.
जून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत एकूण ९ लाख ५७ हजार ५९० परीक्षार्थनी अर्ज केला होता, पैकी ४ लाख ५६ हजार ६२५ प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यातून १३ हजार ३६६ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून २ हजार ५६८ विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यातून ९९० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Best Reader's Review