Breaking News

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम !

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 03-02-2018 | 12:24:55 am
  • 5 comments

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स

सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम !

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याच्या श्रुती विनोद श्रीखंडे ही   देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असे या परीक्षेचे स्वरूप असते. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे.
सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.

Best Reader's Review