Breaking News

कंपनी सेक्रेटरी व्हा ! - देवेंद्र भुजबळ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 09-09-2017 | 11:34:35 pm
  • 5 comments

कंपनी सेक्रेटरी व्हा !

देशात 1990 साली कंपनी लॉ बोर्डने कंपनी सेक्रेटरी हा अभ्यासक्रम प्रथम सुरु केला. त्या वेळेस गव्हर्मेट डिप्लोमा इन कंपनी सेक्रेटरीशिप दिली जात असे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने 04 ऑक्टोबर, 1968 रोजी केंद्र सरकारने इन्स्टिटयुट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली. संस्थेला संसदेत कायदा पास करुन 1 जानेवारी 1981 पासून स्वायतत्ता देण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून चेन्नई, कलकत्ता आणि मुंबई येथे विभागीय कार्यालये आहे.

कंपनी सेक्रेटरी क्षेत्राचा विकास आणि नियमन करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेचे सदस्यत्व यशस्वीरित्या मिळवणाऱ्या उमेदवारांना संस्था कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रमाणपत्र देते. या प्रमाणपत्रानंतर उमेदवार हे कंपनी सेक्रेटरी म्हणून नोकरी किंवा व्यवसाय करण्यास पात्र ठरतात.

संस्थेने नुकतीच सीएस फाऊंडेशन प्रोग्राम व सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम या पूर्ण वेळ अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या कोर्सची वैशिष्टये म्हणजे सर्व विषयांच्या विद्यार्थ्यां करिता संधी असून दूरस्थ शिक्षण असल्यामुळे जगामध्ये कोठूनही घेता येते, या कोर्स मुळे आर्थिक थैर्य व प्रतिष्ठेचे पद मिळते. शीर्ष व्यवस्थापन/बोर्ड कक्ष मध्ये थेट प्रवेशाची क्षमता मिळते. कार्यरत सदस्यांकरिता स्वरोजगाराची संधी उपलब्ध होते. तसेच नोकरीत आकर्षक वेतन व बढतीच्या संधी मिळतात.

सीएस फाऊंडेशन प्रोग्रामसाठी - पात्रता 10+ 2 उत्तीर्ण किंवा याच्या समकक्ष (10+ 2 उत्तीर्ण किंवा याच्या समकक्ष परीक्षा देणारे विद्यार्थीसुध्दा प्रोव्हिजनल आधारावर सीएस फाऊंडेशन प्रोग्राममध्ये अर्ज करु शकतात.)

डिसेंबर 2017 सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदणीची अंतीम तारीख 30 सष्टेंबर 2017 आहे. यासाठी नोंदणी शुल्क रु.4500/- आहे.

सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम साठी पात्रता स्नातक किंवा याच्या समकक्ष (ललित कला सोडून कोणतेही विषय)/सीएस फाऊंडेशन उत्तीर्ण (स्नातक अंतिम वर्ष किंवा याच्या समकक्ष परीक्षा देणारे विद्यार्थीसुध्दा प्रोव्हिजनल आधारावर सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये अर्ज करु शकतात.) डिसेंबर 2017 सत्रामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या दोन्ही मॉडयुलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश नोंदणीची अंतीम तारीख 30 सप्टेंबर 2017 आहे.

रजिस्ट्रेशन फी सीएस फाऊंडेशन उत्तीण विद्यार्थी रु.8500/-, कॉमर्स स्नातका करिता रु.9000/-, कॉमर्सच्या अतिरिक्त इतरांकरिता रु.10000/- आहे.

आयसीएसआयला देय संपूर्ण फी www.icsi.edu वर "ऑनलाईन सर्व्हिसेज" पर्यायावर पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरु शकता.

अनुसूचित जाती/अनुसूचित जनजाती/शारीरिक विकलांग आणि युध्द विधवा व सैनिक बलातील शहीद झालेल्यांच्या मुलांकरिता फीमध्ये सूट आहे.

दि इन्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनला विनियमित आणि विकसित करण्याकरिता संसद अधिनियम (कंपनी सेक्रेटरीज अधिनियम, 1980) अंतर्गत स्थापित एक प्रमुख राष्ट्रीय व्यावसायिक संस्था आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या www.icsi.edu /ccgrt या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा मुंबई येथे 022-22844073,22047569,22047580,22047604,61307900,औरंगाबाद 0240-2451124,भाईंदर022-28183888,7738517888,डोंबिवली 022-2445423, कोल्हापूर0231-2526160 नागपूर 0712-2453276, नाशिक 0253-2318783, नवी मुंबई 022-27577816, ठाणे 022-25891333,25893793, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

-देवेंद्र भुजबळ

Best Reader's Review