Breaking News

वशिलेबाजीला बसणार चाप; सरकारी नोकरभरतीसाठी पोर्टल आणणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 20-08-2017 | 12:02:42 am
  • 5 comments

वशिलेबाजीला बसणार चाप; सरकारी

नोकरभरतीसाठी पोर्टल आणणार

मुंबई – सरकारी नोकरी मिळविण्यासाठी होणाऱ्या वशिलेबाजीला आता चाप बसणार आहे. कारण सरकारच्या कोणत्याही विभागातील भरतीसाठी उमेदवारांना द्याव्या लागणाऱ्या परिक्षेसाठी लवकरच एक पोर्टल सुरु केले जाणार आहे, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम यांनी दिली. नोकरभरतीमध्ये प्रशासनामुळे सरकारला टिकेचे धनी होऊ लागता कामा नये. तसेच नोकरभरतीत पारदर्शकता आणण्यासाठी हे पोर्टल सुरु करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मध्य प्रदेश सरकारलाही प्रशासनाच्या त्रुटीमुळे सरकारी नोकर भरतीतील “व्यापम घोटाळा’चा मोठा फटका बसला होता. तसेच नोकर भरतीमध्ये होणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे सरकारी नोकर भरती वादग्रस्त ठरते, असे गौतम चटर्जी म्हणाले. त्यामुळे सरकारी नोकरभरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन पोर्टल आणले जाणार आहे.

महाराष्ट्र माहिती, तंत्रज्ञान महामंडळ आणि यूएसटी ग्लोबल कंपनीने हे पोर्टल विकसीत केले आहे. या संबंधित विभागांना नोकर भरतीसाठी या पोर्टलवर प्रश्नावली अपलोड करावी लागणार आहे, असे ते म्हणाले. ही एक उपयुक्त आणि सुरक्षित प्रणाली असून आयटी महामंडळाद्वारे ही परिक्षा घेतली जाईल. ही परिक्षा एआयसीटीईद्वारा मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये होईल, असे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी कौस्तुभ धवसे यांनी सांगितले.

Best Reader's Review