Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि दिशाचा अभाव - शरद पवार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 02-02-2020 | 12:04:55 am
  • 5 comments

केंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी

आणि दिशाचा अभाव - शरद पवार

मुंबई : सर्वात मोठे बजेट भाषण होते. दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केली. रोजगार निर्मिती आणि विकासासाठी ठोस काहीच नाही. बेरोजगारीच्या प्रश्नाकडे योग्यप्रकारे लक्ष दिले गेलेले नाही. हे सर्वात लांब भाषण होते. परंतु त्यामध्ये दूरदृष्टी आणि दिशा देण्याचा अभाव होता. तर ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. या अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु दुप्पट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दूरदृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे. हे अजूनही एक दूरचे स्वप्न दाखविण्यात आले आहे, असे पवार म्हणालेत.

त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. निराशाजनक आणि गोंधळात टाकणारे बजेट सादर केले आहे, असे राहुल गांधी म्हणालेत. महाराष्ट्र आणि मुंबईची घोर निराशा झाल्याची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बजेटमध्ये जनतेची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

Best Reader's Review