Breaking News

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 02-02-2020 | 12:01:09 am
  • 5 comments

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा

अर्थसंकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच साल २०२० साठीचा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे नुकतेच विश्लेषण केले आहे. हा अर्थसंकल्प देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.  या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती तसेच स्किल डेव्हलपमेंटवर अधिक भर देण्यात आल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पाचे कौतुक करत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. 

निर्यात वाढवण्यासाठी नव्या घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आला. तसेच धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करतोय असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देणारा असेल असेही ते म्हणाले.

Best Reader's Review