Breaking News

विकासाचा वेग आणखी मंदावला, जीडीपी ४.५ टक्क्यांवर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 29-11-2019 | 11:43:58 pm
  • 5 comments

विकासाचा वेग आणखी मंदावला, जीडीपी ४.५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : देशाचा विकासदर दिवसेंदिवस घसरत चाललेला दिसतोय. सप्टेंबर महिन्यात देशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर घसरलाय. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वात खालचा स्तर आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर ४.५ टक्के राहिल्याचं उघड झालंय. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्क्यांवर होता तर एका वर्षापूर्वी हाच आर्थिक विकास दर ७ टक्क्यांवर होता. सरकारी आकड्यानुसार, कोअर सेक्टरचं उत्पादन ऑक्टोबर महिन्यात ५.८ टक्क्यांनी घसरलंय. 

उत्पादन क्षेत्रातली घट, ऑटोमोबाइल आणि रिअल इस्टेट क्षेत्राची संकटातली स्थिती, वाढती बेरोजागारी या सगळ्या चिंतांमध्ये आता GDP चे दर घसरल्याने भरच पडली आहे.

महसुली तोट्याच्या आघाडीवरही वाईट बातमी आहे. २०१८-१९ च्या पहिल्या ७ महिन्यात म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यानही महसुली तोटा विद्यमान आर्थिक वर्षाच्या लक्ष्यापेक्षा जास्त झाला आहे. पहिल्या ७ महिन्यात महसुली तोटा ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज रुपये) राहिला. जो अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या १०२.४ टक्के आहे. सरकारकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबरच्या कालावधीत सरकारला ६.८३ ट्रिलियन रुपयाचा महसूल प्राप्त झाला. तर खर्च १६.५५ ट्रिलियन रुपये राहिला

Best Reader's Review