Breaking News

#Budget2019 : काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 05-07-2019 | 11:39:03 pm
  • 5 comments

#Budget2019 : काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

नवी दिल्ली – ‘मोदी-2′ सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) लोकसभेमध्ये सादर केला. त्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र या बजेट मुळे निराशा झाली आहे. सरकारच्या या बजेट मुळे काही गोष्टींवर कर वाढवले तर, काही गोष्टी करमुक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय होणार महाग –

सोने
पुस्तके
तंबाखूजन्य पदार्थ महागणार
डिजीटल कॅमेरा महाग
काजू महाग
पेट्रोल-डिझेल (प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार)
पिव्हीसी पाईप महागणार
गाड्यांचे सुटे भाग महाग होणार
सिंथेटीक रबर महागणार
ऑप्टीकल फायबर
घरांच्या टाइल्सच्या किंमती वाढणार
व्हिनएल फ्लोअरिंग महागणार

काय होणार स्वस्त –

इलेक्ट्रीक कार (विजेवर चालणारे वाहने)
विमा स्वस्त होणार
घरे स्वस्त होणार (भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार)

Best Reader's Review