Breaking News

अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा : वाचा सविस्तर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 05-07-2019 | 11:33:49 pm
  • 5 comments

अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा : वाचा सविस्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ ला मंजूरी देण्यात आली आहे. निर्मला सितारामन या देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला. तब्बल दोन तास पंधरा मिनिटे त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देशाच्या पहिल्या स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांचे आभार मानले. निर्मला सितारामन यांनी  देशातील प्रत्येक करदात्याचे यावेळी आभार मानले. त्यांच्या भाषणातील महत्वपूर्ण घोषणा वाचा सविस्तर  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

· केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सितारामन यांच्या भाषणाला सुरुवात

· एमएसई नावाखाली बोगस रित्या कारभार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई

· सोने आणि अन्य धातूंवरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर

· पेट्रोल-डिझेल एक्साईज कर आणि रोड सेस वाढणार - इंधन महागणार 

· न्युक्लीअर पावर प्लांटसाठीच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क कमी

· काजू, टाईल्स, मोटारीचे सुटे भाग, फायबर केबल, कॅमेरा, डिजिटल रेकॉर्डरवरील आयातशुल्क वाढ

· भारतातील इ उत्पादनांवरील निर्यात कर रद्द

· देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या मालावरील शुल्क कमी

· जीएसटी परतावा मिळण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान प्रणाली आणणार

· जीएसटी भरण्याची पद्धत सुलभ करणार

· जीएसटीमुळे एक देश एक कर पद्धती अंमलात आली

· जीएसटीमुळे समोर येणाऱ्या अडथळ्यांवर देशाने मात केली

· दोन ते सात कोटी उत्पन्न असलेल्यांना ३ टक्के अधिभार लागणार

· निर्मला सितारामन यांनी मानले करदात्यांचे आभार

· वर्षाला १ कोटींवर रक्कम बॅंक खात्यास भरल्यास दोन टक्के टीडीएस

· आयकर चौकशीसाठी ईलेक्ट्रोनिक पद्धतीने अधिकाऱ्यांकडे फाईल पोहोचणार

· आयकर परतावा केल्यानंतर येणाऱ्या चौकशीसाठी एक ई-प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जाणार

· ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आधारकार्डद्वारेही भरू शकता आयकर

· इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताची क्रमवारी वाढली

· ४० लाखांपर्यंतच्या किमतीतील घरे घेणाऱ्यांना कर्जाच्या प्रक्रीयेत १.५० लाखांपर्यंतची बचत

· १५ वर्षांच्या गृहकर्ज घेणाऱ्यांना ७ लाखांची बचत होणार

· परवडणारी घरे निर्माण करणाऱ्यांना कर सवलत

· स्टार्टअप्सच्या योजनांसाठी राहत घर विकणाऱ्यांना करातून सवलत वाढवली

· ई-वाहनांची खरेदी करणाऱ्यांना करात सवलत

· ई-वाहनांच्या खरेदीवर अडिच लाखांपर्यंतचा फायदा

· स्टार्टअप्सना एंजल टॅक्स हा मुद्दा भेडसावत आहे

· स्टार्टअप्सला उभा करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची स्क्रूटीनी होणार नाही

· बॅंकींग व्यवस्था पुन्हा सुधारणार

· गृहकर्ज क्षेत्राला नियामक मंडळ म्हणून रिझर्व्ह बॅंक काम पाहणार

· बिगर बॅंकींग संस्थांना आर्थिक मदत करताना सार्वजनिक बॅंकांकडून १ लाख कोटींपर्यंतचे कर्ज

· बॅंकेत खातेधारकाला माहीत नसताना होणाऱ्या जमा रक्कमेबद्दल चौकशीसाठी बॅंकेला विशेषाधिकार

· राष्ट्रीय बॅंकांना भांडवल वाढीसाठी ७० हजार कोटींचा निधी देणार

· देशातील आदिवासी जमातींच्या भाषा, नृत्य प्रकार, संस्कृतींची जपणूक करणार

· जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांद्वारे पर्यटनाला चालना देणार

· भारत सरकारने १७ पर्यटन स्थळांना जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे बनवणार

· एनआरआय भारतीय पारपत्रधारकांना आधारकार्डची सोय उपलब्ध

· महिला उद्योजिका तयार करण्याचे आमचे उद्दीष्ट

· महिला बचत गट व जनधन योजनेतील खात्यात महिलांना पाच हजारांची ओव्हरड्राफ्ट सेवा

· लोकसभेत ७८ महिला खासदार हा विक्रम आहे

· अर्थव्यवस्थेतील महिलांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे अशक्य

· ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी मोठी असल्याचे प्रतिपादन

· अर्थसंकल्पातील महिलांसाठीच्या घोषणेसाठी नारी तू नारायणी योजना 

· एलईडी बल्ब योजनेची व्याप्ती आणखी वाढवणार

· एलईडी बल्बद्वारे उर्जेवरील १८ हजार कोटींची बचत

· उजाला योजनेअंतर्गत ३५ कोटी बल्बचे वितरण

· लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार

· प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे ६० वर्षानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन

· असंघटीत कामगारांना ३००० रुपये निवृत्ती वेतन

· नव्या उद्योगांना आवश्यक तंत्रज्ञानासाठी बॅंकांकडून अर्थसहाय्य

· देशातील १० अब्ज मुलांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणार

· राष्ट्रीय खेळ प्रशिक्षण केंद्राद्वारे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या विकासासाठी काम करणार

· खेलो इंडियाद्वारे खेळाचे महत्व देशभरात पोहोचले

· गेल्या पाच वर्षांत तीन शैक्षणिक संस्था जगातील दोनशे संस्थांमध्ये पोहोचल्या

· शैक्षणिक संस्थांचा दर्जा आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

· ज्ञान योजनेअंतर्गत शिक्षणाची व शिकवण्याची पद्धतीही अद्यावत केली जाणार

· नवी शिक्षण प्रणालीही सरकार जाहीर करणार

· शिक्षणासाठी ४०० कोटींचा निधी देणार

· शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल करणार

· देशात राष्ट्रीय संशोधन केंद्रांची स्थापना केली जाणार

· संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लेखाजोखा ठेवणार

· संशोधनासाठी एकत्र असलेला निधी एकत्र करणार

· शहरी भागांसाठीही लोकहितांच्या योजना आणणार

· प्रधानमंत्री डिजिटल साक्षर योजनेतून दोन कोटी लोक डिजिटल साक्षर

· स्वच्छ भारत योजनेतून ९ कोटी शौचालयांची निर्मिती

· स्वच्छ भारतमधून लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज

· जलशक्ती मंत्रालयाद्वारे प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवण्याचा विचार

· रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्पांची अंमलबजावणी करणार

· प्रत्येकाला स्वच्छ पेयजल मिळावे यासाठी प्रयत्नशील

· शेतकऱ्यांना झिरो बजेट फार्मिंगसाठी मार्गदर्शन

· झिरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन

· कृषि क्षेत्राच्या उन्नतीसाठी राज्यांनाही सोबत घेणार

· पारंपारिक उद्योगांना चालना देण्यासाठी सुविधा केंद्रांची उभारणी

· पारंपारिक उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड, विपणन, वितरण प्रणाली व्यवस्था उभारणार

· पारंपारिक उद्योगांसाठी ८० इनक्युबेटर सेंटर तयार करणार

· अन्नदात्याला उर्जादाता करणार

· कृषि क्षेत्रातून उर्जा तयार करण्यासाठी योजना

· दूग्धव्यवसाय क्षेत्रालाही उभारी देणार

· डाळींच्या उत्पादनात देश स्वयंपूर्ण होणार

· मासेमारी व्यवसायाला उभारी देणार

· प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे १ लाख २५ हजार किमीचे रस्ते बांधले जाणार

· प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत ८० हजार ३८५ कोटींची तरतूद

· ११४ दिवसांत प्रत्येक बेघराला घर देणे शक्य

· अंत्योदय योजनेद्वारे ग्रामीण भारताला पुढे आणणार

· उज्वला, सौभाग्य योजनांचा सामावेश केला

· ७ कोटी गॅस जोडणी देशभारत पोहोचली

· प्रत्येक गावात सौभाग्य योजना पोहोचली

· खेड्यातील प्रत्येक घरात वीज पोहोचवली जाणार आहे

· पंतप्रधान आवास योजनेतून १.९५ कोटी घरांची बांधणी केली जाणार

· एलपीजी, वीज, शौचालय आदी सुविधा उपलब्ध असलेली घरे बांधणार

· आंतराळात क्षेत्रात व्यावसायिक दृष्टीने लक्ष करण्याचा विचार सरकार करत आहे

· भारत एक अंतराळातील शक्ती म्हणून जगात ओळखला जाऊ लागला आहे

· एनआरआयतर्फे केल्या जाणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी वेगळा मंच उपलब्ध करून देणार

· देशातील मेट्रो जाळ्याचा ६५० किमीपर्यंतचा विस्तार

· ग्लोबल इंडस् मीट्सद्वारे भारतातील गुंतवणूक वाढवण्याचा विचार

· मीडिया, इलेक्ट्रोनिक क्षेत्रात एफडीआय वाढवणार

· जगभरात गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतला मात्र, भारतातील परकी गुंतवणूकीची वाढ

· म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणूकींना प्रोत्साहन

· पायाभूत सुविधांसाठी सरकार रोखे बाजारात आणणार

· ३ कोटी दुकानदारांना पेन्शन योजना मिळणार

· प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनांवर छोट्य़ा दुकानदारांना संरक्षण

· एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना एक कोटींपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार

· केंद्र सरकारच्या विविध जमिनींवर लोकोपयोगी प्रकल्प उभारणार

· केंद्र सरकारच्या पडित जागांवर घरांचीही निर्मितीही करणार

· ई-वाहनांना मंजूरी आणि त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देणार *-

· देशांतर्गत आणि देशाबाहेरील जलवाहतूकीला प्रोत्साहन देणार

· यासाठी पन्नास लाख बोटींची आवश्यकता

· रेल्वे सेवा अद्यावत करण्यासाठी खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर विकास करणार

· एक देश-एक वीज पुरवठा करण्यासाठी एकाच कार्डची घोषणा करणार

· भारतमाला, सागरमाला या महत्वाकांशी प्रकल्पाद्वारे दळणवळण सुविधा अद्यावत करण्यात आल्या

· रोजगार देणारा देश म्हणून भारताची जगात ओळख होईल

· पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे सर्व वाहतूकीच्या साधनांसाठी एकाच कार्डाद्वारे प्रवास शक्य होणार आहे

· मोबिलीटी कार्डची लवकरच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार

· पाच हजार अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट

· पाच वर्षात एक हजार अब्ज डॉलर्सवर अर्थव्यवस्था नेऊन ठेवली

· स्वातंत्र्यांपूर्वी स्वदेशीचा प्रसार करण्यात आला भाजप सरकारने तो मेक इन इंडियाचा प्रचार केला

· या वर्षी तीन हजार अब्ज डॉलर्स इतकी मोठी अर्थव्यवस्था बनेल : अर्थमंत्री

· एमएसएमई क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न करणार

· अर्थसंकल्प पहिल्यांदाच ब्रिफकेसऐवजी लाल कपड्यात संसदेत आणण्यात आला

· सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला होणार सुरुवात

· अर्थसंकल्पाची प्रत राष्ट्रपतींकडे सूपूर्द

· शेअर बाजारात मोठी चढउतार

Best Reader's Review