Breaking News

नीरव मोदीविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 11-03-2019 | 11:35:40 pm
  • 5 comments

नीरव मोदीविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदीविरोधात ईडीने सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए कायद्यातंर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून नुकताच द टेलिग्राफ या वृत्तपत्राने नीरव मोदी लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ प्रसारित केला होता.

यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने ही कारवाई केली आहे. नीरव मोदीचा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ईडीला आणखी पुरावे सापडले. त्यामुळे आम्ही पुरवणी आरोपपत्र दाखल केल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला नीरव मोदीच्या वास्तव्याविषयी माहिती असून आम्ही त्याच्या प्रत्यर्पणाबाबत प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले होते. जुलै २०१८मध्ये इंग्लंड सरकारला याबाबत विनंती करण्यात आली आहे. यावर त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

Best Reader's Review