मोदींचामास्टरस्ट्रोक!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 02-02-2019 | 12:46:32 am
  • 5 comments

मोदींचा मास्टरस्ट्रोक!

नवी दिल्ली -मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे.या अर्थसंकल्पात पियूष गोयल यांनी करपात्र उत्पन्नाची मर्यादा महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सध्या अडीच लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करीत ते पाच लाख रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. याशिवाय आयकर कायद्याच्या ८० सी कलमाखाली असलेल्या विविध योजनांमधील दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.  

कामगारांना 7 हजाराचा बोनस

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली. तसेच 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. तसेच प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे. मात्र या अर्थसंकल्पात नोकरदारांना जीएसटीतून सवलत नाही. छोट्या व्यापाऱ्यांना मात्र जीएसटीत सवलत मिळणार आहे.  

64 हजार 500 कोटींची रेल्वे खात्यासाठी तरतूद

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधेल,अशी शक्‍यता आहे. गोयल यांच्याकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प सरकारचा सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प ठरणार आहे.

या अर्थसंकल्पात पियूष गोयल यांनी रेल्वे खात्यासाठी 64 हजार 500 कोटींची तरतूद केली आहे महत्त्वपूर्ण तरतूद केली आहे. वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात धावणार आहे. मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. 3 लाख 38 हजार बोगस कंपन्यांना टाळं लावलं, एक कोटी नागरिकांनी नोटाबंदीनंतर कर भरला, एक लाख 36 हजार कोटींची करवसुली झाली. जनधन योजनेअंतर्गत 34 कोटी बँक खाती उघडली, यंदा करदात्यांची संख्या वाढली, 12 लाख कोटी रुपये कर स्वरूपात मिळाले आहेत, पाच वर्षांत विमान प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढली.

शेतकऱ्यांसाठी 500 रूपये किती महत्वाचे, हे एसी रूममध्ये बसणाऱ्यांना काय कळणार -पियुष गोयल

आजच्या अर्थसंकल्पानंतर एएनआय या वृतसंस्थेला मुलाखात देताना गोयल यांनी या योजनेंबदल सविस्तर माहिती देत महत्व सांगितलं. शेतकरी वर्गासाठी 500 रूपये ही रक्कम किती महत्वाची असते, ते एसी रूममध्ये बसणाऱ्यांना कळणार नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शेतकऱ्यांकडे खर्चासाठी एक रूपयाही जवळ नसतो. अशावेळी अनेक महत्वांच्या कामासाठी हे पैसे कामी येतील. ही रक्कम म्हणजे अनुदान नव्हे तर आपल्या अन्नदात्याचा सन्मान म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

 

Best Reader's Review