5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 02-02-2019 | 12:38:17 am
  • 5 comments

5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मतदारांना खूष करण्याची अखेरची संधी त्या माध्यमातून मोदी सरकार साधला आहे. गोयल यांच्याकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प सरकारचा सहावा आणि अंतिम अर्थसंकल्प ठरणाला आहे.

या अर्थसंकल्पात पियूष गोयल यांनी करपात्र उत्पन्नाची मर्यादा महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सध्या अडीच लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करीत ते पाच लाख रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. याशिवाय आयकर कायद्याच्या ८० सी कलमाखाली असलेल्या विविध योजनांमधील दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होणार आहे. तसेच गृहकर्जावरील व्याजावर असलेली दोन लाख रुपयांपर्यंतची करांची सूट तसेच आरोग्य विमा योजनेला असलेली कर सवलत, नोंदणीकृत धर्मादाय संस्थांना दिलेली देणगी अशा अन्य मार्गांनीही करबचत होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. बँक क्षेत्रामधील ठेवींवरील व्याज वर्षाला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्यावर उद्गमी करकपात केली जात होती. ज्या ठेवीदारांचे उत्पन्न करपात्र नाही, अशांना दरवर्षी बॅँकेला 15 जी/एच हा फॉर्म भरून द्यावा लागत होता. आता ही मर्यादा 40 हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढून बॅँकांना दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे.

Best Reader's Review