संसदेत मोदी...मोदी आणि फक्तच मोदीच!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 02-02-2019 | 12:34:52 am
  • 5 comments

संसदेत मोदी...मोदी आणि फक्तच मोदीच!

नवी दिल्ली : मोदी सरकारचा २०१९ सालचा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. या अर्थसंकल्पामधून शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. अरुण जेटली यांच्या अनुउपस्थितीमध्ये हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर होत असताना सतत मोदी नामाचा जयघोषत पाहायला दिसून येत होता. मात्र, एक क्षण असा होता जिथं सतत मोदी नामाचा जयघोष ऐकू येत होता. यामुळे पियुष गोयल यांनादेखील आपला अर्थसंकल्प मांडताना थांबावे लागले होते.

नेमकं झालं काय?

गोयल यांनी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्यानंतर संसदेतील एनडीएच्या खासदारांनी बाके वाजून मोदी नावाचा जयघोष सुरु केला. खासदारांनी ‘मोदी मोदी मोदी’ अशा घोषणा सुरु केल्या. यावेळी स्वतः मोदी यांनीदेखील बाके वाजवून खासदारांना पाठिंबा दिला. जवळपास एक ते दीड मिनिटे हा जयघोष सुरु होता. सरकारच्या या अर्थसंकल्पातील ही सर्वात मोठी घोषणा असल्याचे मानले जात आहे

Best Reader's Review