Breaking News

#Budget 2019: जाणून घ्या…अर्थसंकल्पातील ३७ महत्वाचे मुद्दे !

 • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 01-02-2019 | 11:56:36 pm
 • 5 comments

#Budget 2019: जाणून घ्या…अर्थसंकल्पातील ३७ महत्वाचे मुद्दे !

 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी लोकसभेत २ तास अर्थसंकल्पावर भाषण दिले. दरम्यान, त्यांनी मोदी सरकारची ५ वर्षाची कामगिरी सांगितली. तसेच अनेक आश्वासने आणि घोषणा केल्या.

जाणून घ्या थोडक्यात संपूर्ण अर्थसंकल्प…

 1. #Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

 2. #Budget 2019 :कामगारांना 7 हजाराचा बोनस

 3. #Budget 2019 : 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त

 4. #Budget 2019 : 64 हजार 500 कोटींची रेल्वे खात्यासाठी तरतूद

 5. #Budget २०१९ : मोदी सरकारच्या घोषणेने शेअर बाजारात तेजी

 6. #Budget 2019 – संरक्षण खात्यासाठी 3 लाख कोटींची तरतूद 

 7. #Budget 2019: देशातील साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार- पियूष गोयल

 8. २०२० पर्यंत गृहप्रकल्पाची नोंदणी केल्यास आयकरात सवलत.

 9. ४० हजारापर्यंतच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर आता टीडीएस लागणार नाही.

 10. ५ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्ण कर सवलत मिळेल. दीड लाखापर्यंतच्या बचतही करमुक्त. असे एकूण ६.५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना मोदी सरकारचा दिलासा.

 11. पशूपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे २ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार.

 12. नोकरदारांना निराशा, जीएसटीतून सवलत नाही. छोट्या व्यापाऱ्यांना मात्र जीएसटीत सवलत.

 13. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, मध्यमवर्गीयांना मोदी सरकारकडून दिलासा नाही.

 14. घर खरेदी करणाऱ्यांसाठी जीएसटी कमी करण्याचा विचार सुरु. यासंदर्भातला निर्णय जीएसटी परिषद घेईल.

 15. यंदा १२ लाख कोटी रुपये कर स्वरूपात मिळाले. करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ.

 16. मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवर.

 17. महामार्ग निर्मितीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर. दररोज देशात 27 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती.

 18. येत्या ५ वर्षात १ लाख गावे डिजिटल करणार.

 19. रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटींची तरतूद. वंदे भारत हायस्पीड ट्रेन पहिल्यांदाच भारतात.

 20. संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद. ओआरओपीसाठी ३५ हजार कोटींचे कर्ज.

 21. गर्भवती महिलांना २६ आठवड्यांची पगारी सुट्टी.

 22. नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखांवरून ६ लाखांपर्यंत.

 23. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांना दरमहा ३ हजार रुपये बोनस. निवृत्त कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन. ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आली.

 24. २१ हजार पगार असलेल्या असंघटित कामगारांना ७ हजार बोनस देण्याची घोषणा. १० कोटी असंघटित कामगारांना लाभ.

 25. गाईंसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार. गाईंच्या प्रजाती सुधारणार

 26. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात जमा होणार. पियूष गोयल यांची घोषणा. तर ५ एकरपर्यंत दरमहा ५०० रुपये खात्यात. १ डिसेंबर २०१८ पासून योजनेची अंमलबजावणीची सुरुवात होणार असून ३ आठवड्यात रक्कम जमा होणार

 27. रियल इस्टेटमध्ये पारदर्शकता आली. रेरासारखे कायदे आणले, रेरामुळे बेनामी संपत्ती असणाऱ्यांचे पितळ उघडे पडले.

 28. राज्यांना आधीच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळणार अशी घोषणाही पियूष गोयल यांनी केली.

 29. आम्ही सौभाग्य योजना आणली, मार्च २०१९ पर्यंत सगळ्या कुटुंबांच्या घरात वीज मिळणार.

 30. १ लाख ५३ हजार घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बनविण्यात आली.

 31. स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद.

 32.  २०२० पर्यंत प्रत्येकाला घर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.

 33. जीएसटी लागू करणे अर्थव्यवस्थेसाठी मोठे पाऊल.

 34. कर्जबुडव्यांकडून तीन लाख कोटींचे कर्ज वसुल – पियुष गोयल 

 35. पियुष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बॅंकांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजात जो टीडीएस लावला जात होता त्याची मर्यादा वाढवून शहरी मध्यमवर्गीयांना त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला

 36. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजनेसाठी केली पाचशे कोटींची तरतूद

 37. पाच लाख रूपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. तसेच आयकरासाठीची प्रमाणीत वजावटीची मर्यादाही 40 हजार रूपयांवरून 50 रूपये करण्यात आली

Best Reader's Review