Breaking News

केंद्र सरकारच्या #Budget2019 वर व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा निशाणा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 01-02-2019 | 11:33:40 pm
  • 5 comments

व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा निशाणा

पुणे – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. मात्र आजच्या अर्थसंकल्पबाबत आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

यावर आता राष्ट्रवादीने व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लक्ष करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमच्या घोटाळ्यांची लक्तरं इतकी आहेत की कितीही सारवासारव केली किंवा मोठमोठी आश्वासने दिली तरीही आता काहीही फायदा होणार नाही. बुँदसे गयी वो हौदसे नहीं आती अशी सरकारची परिस्थिती आहे अशी टीका या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

View image on Twitter

NCP@NCPspeaks

तुमच्या घोटाळ्यांची लक्तरे इतकी आहेत, की कितीही सारवासारव केली वा मोठमोठी आश्वासने दिली तरीही 'बुँदसे गयी वो हौद से नही आती' ही सरकारची परिस्थिती आहे.@narendramodi @PMOIndia @AmitShah @PiyushGoyal @BJP4India

30

4:20 PM - Feb 1, 2019

 

 

व्यंगचित्रात मोदी आणि शाह यांना फाटक्या कपड्यांमध्ये दाखवण्यात आले आहे. राफेल, सांख्यिकी आयोग याच्यासह इतर जुमले यामुळे ते जनतेसमोर जाऊ शकत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या मोठ्या कापडाने स्वतला झाकून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनाच खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दाखविण्यात आले आहे.

Best Reader's Review