Breaking News

खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स न ठेवल्यास बँकाकडून वसूल करण्यात आले 5 हजार कोटी रूपये

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:39:15 am
  • 5 comments

खात्यामध्ये कमीत कमी बॅलन्स

बँकाकडून वसूल करण्यात

आले 5 हजार कोटी रूपये

नवी दिल्ली – खात्यांमध्ये कमीत कमी बॅलन्स न ठेवल्यास बँक ग्राहकांकडून ठरावीक रक्कम दंड म्हणून आकारते. अशाप्रकारे दंड वसूल करून देशातील बँकांनी 5 हजार कोटी रूपये वसूल केले आहेत. यामध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया आघाडीवर आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील 21 बँक आणि खाजगी क्षेत्रातील तीन प्रमुख बँका यांनी वित्त वर्ष 2017-18 दरम्यान कमीत कमी बॅलन्स न ठेवल्याने ग्राहकांकडून 5 हजार कोटी रूपये वसूल केले आहेत. बँकिंग आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.यामध्ये स्टेट बँक इंडिया आघाडीवर राहिली आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने 2433.87 कोटी रूपये तर एचडीएफसी बँकेने 590.84 कोटी रूपये, एक्सिस बँकेने 530.12 कोटी रूपये तर आईसीआईसीआई बँकेने 317.60 कोटी रूपये वसूल केले आहेत.

Best Reader's Review