Breaking News

मल्ल्याकडील कर्ज वसुलीचे प्रयत्न जारी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 08-07-2018 | 12:05:03 am
  • 5 comments

मल्ल्याकडील कर्ज वसुलीचे प्रयत्न जारी

स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – भारतातील बॅंकांचे कोट्यवधी रूपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्याकडील कर्ज वसुली करण्यासाठी ब्रिटन मधील अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अरिजीत बसू यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की या संबंधात कोर्टाने दिलेला निकाल महत्वपुर्ण असून त्यामुळे आम्हाला हे प्रयत्न करण्याचे अधिकार मिळाले आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे मल्ल्याकडील बऱ्यापैकी रक्कम आम्हाला वसुल करता येणे शक्‍य आहे असे ते म्हणाले.

ब्रिटन मधील कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्याच्या जगभरातील साऱ्या मालमत्ता गोठवण्यात येत आहेत. त्याच्या आधारे आम्ही ब्रिटन मधील अधिकाऱ्यांच्या मदतीने हे प्रयत्न सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मल्ल्याने एकूण 13 भारतीय बॅंकांचे पैसे बुडवले आहेत. त्यात सर्वाधिक वाटा स्टेट बॅंकेचा आहे.

मल्ल्याच्या भारतातील मालमत्तांचा लिलाव करून भारतीय बॅंकांनी आत्ता पर्यंत 963 कोटी रूपये मिळवले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. अलिकडेच ब्रिटन मधील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी भारतातील 13 बॅंकांना मल्ल्याकडून कर्ज वसुलीच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे.

Best Reader's Review