Breaking News

पुन्हा एकदा पेट्रोल महाग, १५ पैशांनी दरवाढ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 27-05-2018 | 05:05:36 pm
  • 5 comments

पुन्हा एकदा पेट्रोल महाग, १५ पैशांनी दरवाढ

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर ईंधन दरवाढीवरुन मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. हे होत असतानाच सलग १४ व्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल महाग झाले आहे. आज झालेल्या दरवाढीत पेट्रोलचे दर १५ पैशांनी वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात मुंबईत प्रतिलिटर १५ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १७ पैशांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईत पेट्रोलचे दर ८५ रुपये ९६ पैसे आहेत तर पुण्यात देखील पेट्रोलचे दर ८५ रुपये ६२ पैसे आहेत पुण्यात हे दर १४ पैशांनी वाढले आहेत. सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र आता पुढे देखील असेच झाले तर या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होईल असे दिसून येत आहे.
सलग होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिसा आणि डोकंही चांगलंच गरम झाले आहे. सरकारी पातळीवर इंधनदर कमी करण्याबाबत घोषणा होत असल्या तरी अंमलबजावणी शून्य असल्याचं दिसून येत आहे.
संपूर्ण भारत देशात पेट्रोल आणि डीझेलचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या दरवाढीविरोधात महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान केंद्र सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पेट्रोल आणि डीझेल दरवाढीसंदर्भात लवकरच दीर्घकालीन उपाय काढण्यात येईल असे आश्वासन जनतेला दिले आहे. त्यामुळे आता या दरवाढीचे पुढे काय होते हे बघणे महत्वाचे आहे.

Best Reader's Review