विषाणूचा फैलाव रोखणारे बहुउपयोगी लेपन विकसित नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020 बंगळुरू इथल्या जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्राने (JNCASR) एक नवीन सूक्ष्मजीव रोधक पदार्थ शोधून काढला असून या पदार्थाचा लेप इन्फ्ल्यूएन्झाच्या घातक विषाणूंना निष्प्रभ करतो असे सिद्ध झाले आहे. JNCASR ही विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. श्वसन मार्गाच्या संसर्गसाठी कारणीभूत असलेल्या या विषाणूला रोखणारे हे लेपन कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत काम करणारे विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ या संशोधनासाठी पुढील मदत करणार आहे. या लेपनाशी संपर्क आल्यावर एन्फ्लुएन्झाचा विषाणू 100% नष्ट होतो हे सिद्ध झाले आहे. एन्फ्लुएन्झाचा विषाणू एका आवरणाने झाकलेला असतो, कोविड-19 चा विषाणू ही तशाच आवरणाने झाकलेला असतो. त्यामुळे या एन्फ्लुएन्झाच्या विषाणू प्रमाणेच कोविड-19 चा विषाणू देखील ... ...

कानपूरचे संशोधक सर्जिकल मास्कवर लावण्याच्या किफायतशीर विषाणू रोधक थराची निर्मिती करणार नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020 विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या अंतर्गत येणारे विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन महामंडळ (SERB) सध्या आयआयटी कानपूर इथल्या संशोधकांना विषाणू रोधक थराचे उत्पादन करण्यासाठी मदत करत आहे. या विषाणूरोधक  थराचा उपयोग कोविड-19 शी मुकाबला करताना वापरण्याच्या सर्जिकल मास्क तसेच संरक्षक पोशाखासाठी देखील होणार आहे. संशोधकांचा हा चमू विषाणूरोधक थर बनवण्यासाठी सूक्ष्मजिवाणू रोधक वैशिष्ट्य असलेले सामान्य पॉलिमर आणि पुनर्वापर करण्यासारखे विषाणू रोधक रेणू असलेल्या पदार्थाचा उपयोग करणार असून त्यामुळे हा थर कमी खर्चात तयार होईल. कोविड-19 बाधित रुग्णांवर उपचार करताना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या थराचा लेप दिलेल्या वस्तूंचा सर्वात जास्त फायदा होईल. या पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन ... ...

स्टार्टअपने विकसित केले कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी चांदी आधारित रसायन नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020 विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे पाठबळ दिलेल्या पुण्याच्या वुईइनोव्हेट बायोसोल्युशन्स या स्टार्टअपने नॉन अल्कोहोलिक जलीय कोलॉईडल सिल्वर द्रावण तयार केले आहे. हात आणि पर्यावरणातील इतर पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी आपल्या स्वतःच्या नॅनोएजीसाइड या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे निर्जंतुकीकरणाचे द्रावण तयार करण्यात आले आहे. हे द्रावण बिगरज्वलनशील आणि घातक रसायनविरहित आहे आणि महामारी पसरण्याचे प्रमुख कारण असलेल्या संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गाला रोखण्यामध्ये प्रभावी आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक आणि इतर बाधित लोकांच्या रक्षणासाठी उपयुक्त आहे.  वीइनोव्हेट बायोसोल्युशन्सचे कोलॉईडल सिल्वर सोल्युशन विषाणूजन्य निगेटिव्ह स्ट्रँड आरएनए आणि विषाणूजन्य बडिंग ... ...

मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये ‘जलद प्रतिसाद केंद्र’ स्थापन नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020 कोविड -19 शी दोन हात करण्यासाठी भारत सरकारच्या DST अर्थात विज्ञान तंत्रज्ञान विभागाने 56 कोटी रुपये खर्चून मुंबईत IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात 'सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड -19 हेल्थ क्रायसिस - अर्थात CAWACH (इंग्रजी लघुरूप -कवच ) या केंद्राची स्थापना केली आहे. 'कोविड -19 या आरोग्यविषयक संकटाशी युद्ध करण्यात साथ देण्याचे' काम हे केंद्र करणार असून, कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अभिनव कल्पना लढविणाऱ्या स्टार्टअप उद्योगांचा शोध, मूल्यमापन व त्यांना पाठबळ देण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या पाठबळावर चालणारी, IIT मधील SINE म्हणजेच 'अभिनवता आणि उद्योजकता संस्था' ही 'कवच'ची प्रचालन संस्था म्हणून काम करेल. कोविड -19 ने जगभरात थैमान घातला असुन, या आपत्तीशी लढा ... ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल मुंबई, दि. 2 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल https://covid-19.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड -१९ चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या प्लॅटफॉर्म्सचा मुख्य हेतू आहे.   जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्र व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्या ... ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म' मुंबई, दि. 1 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. 'नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर' ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत.   महाकवच अॅप या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे- क्वारंटाइन ट्रॅकिंग   कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्याआधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ... ...

सायटेक पार्कमधील उदयोन्मुख स्टार्टअपने आणले नवे तंत्रज्ञान ‘सायटेक एरॉन’ नामक ऋण आयन जनित्र  कोणत्याही बंदिस्त वातावरणातील विषाणू, जीवाणू        आणि बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार हवा स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग होणार परिचारिका, कर्मचारी व डॉक्टर यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार विषाणूशी लढण्याची क्षमता वाढवून त्यांच्या आरोग्याची काळजी यामुळे घेतली जाणार यंत्राचे उत्पादन व वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दिले 1 कोटी रुपये महाराष्ट्रातील  रुग्णालयांमध्ये बसविण्यासाठी  अशी 1,000 यंत्रे तयार होणार नवी दिल्ली, 30 मार्च 2020 पुण्याच्या सायटेक पार्कमधील एका उदयोन्मुख कंपनीने, निर्जंतुकीकरणाच्या एका नवीन तंत्रज्ञानाच्या रूपाने कोविड-19 विरुद्धच्या भारताच्या लढाईमध्ये एक प्रभावी तोडगा शोधून काढला आहे. ... ...