जपायचय तिला  ....  'आई' ला '... पृथा वीर आई जगातला सर्वात सुंदर शब्द. या शब्दामध्ये सन्मान, प्रेम, वात्सल्य आहे आणि सार सामावल आहे. ती प्रत्येकाची हक्काची जागा. नऊ मासाचा त्रास सहन करुन ती बाळाला जम्न देते तेव्हा आज आयुष्यातील सर्वात चांगला क्षण असे भाव तिच्या चेह—यावर स्पष्ट दिसतात. खरेतर बाळंतपण म्हणजे आईचे दुसरे जीवन. अपार वेदना सहन करुनही ती दुस—या जीवाला जन्म देण्याचे धाडस दाखवते. इथेच स्त्री पुरुषांपेक्षा सरस ठरते. मातृत्व लादलेल असो की स्त्रीने सहज स्वीकारलेल, दोन्ही परिस्थितीत कष्ट तिलाच होतात. तरी आपला पोटचा गोळा सुखरुप असेल याचीच काळजी तिला जास्त असते. आईविषयी ही वाक्य प्रत्येकाने वारंवार ऐकली असावी. नक्कीच ऐकली असतील, वाचली असतील. पण अनुभवली किती हे मात्र तपासून पहा. कारण आम्हाला आई आवडते आपण म्हणत असलो तरी, आपल्या आयुष्यात रमल्यावर हीच आई कधी नकोशी होते हे कळत नाही. कुणासाठी ती आॅप्शन असते तर काहींसाठी केवळ जग का ... ...

आम्हा पेज थ्रीकरांना माणुसकी उरली नाही पृथा वीर ' आदल्या रात्रीच्या पार्टीमध्ये मला अनेक सेलेब्रिटी चमचे भेटले. पण दुस-या दिवशी हे चमको विनोद खन्‍नांच्या अंत्यसंस्‍कारामध्ये फिरकले सुद्घा नाही. यापैकी अनेकांनी दिवंगत विनोद खन्‍नांसोबत काम केले होते. स्वतःला अभिनेता म्हणून घेणा-यांनी याबद्दल लाज बाळगायला हवी. माझ्याही अंत्यसंस्‍काराला ही मंडळी येणार नाही असे मी गृहीत धरतो.' ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांनी नव्या ‌अभिनेत्यांवर ट्वीटरवर आपला संताप व्यक्त करुन सिनेसृष्टीतील नव्या पिढीचे कान उपटले. ऋषी कपूर यांनी पुढे येऊन या झगमगत्या दुनियेची एक काळी बाजू सर्वांसमोर आणली. हे सिनेस्टार्स सर्वसामान्यांसाठी आयकॉन आहेत. पण वास्तविक जीवनात पेज थ्री कल्चरमध्ये रुळताना सगळे कसे संधीसाधू व कामापुरते मामा असतात हे पुन्हा पहायला मिळते. एक शुक्रवार येतो आणि हे मंडळी स्टार्स होतात. लाखो  फॅन अक्षरक्षः त्यांना फॉलो करतात. आजची पिढी तर सिनेमात दाखवलेले जीवन हीच वास्तविकता समजतात. म्हणूनच युवा ... ...

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे 30 जानेवारी रोजी देहावसान झाले. निर्मलाताईंप्रती आदरांजली म्हणून त्यांच्या जीवन कार्यावर लेख. -------------------- निर्मला गंगा मी पाहिली...   स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या धर्मपत्नी पूजनीय निर्मलाताई यांचे 30 जानेवारी रोजी देहावसान झालं. दैवी स्वाध्याय कार्यात दादांना मोलाची साथ दिली. या माऊलीने धनश्री दीदींसारखं नेतृत्वकुशल रत्न घडवलं. वैश्विक स्वाध्याय परिवारासाठी निर्मलाताई संस्कारदाता ‘आई’ ... ...