पंतप्रधानांचा क्रीडापटूंशी संवाद क्रीडापटूंनी देशाला सन्मान मिळवून दिला आहे, आता देशाचे मनोधैर्य उंचावण्याची आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची महत्त्वाची भूमिका बजावायची आहे: पंतप्रधान   |पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत क्रीडापटूंनी केला सकारात्मकता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या संदेशाचा प्रसार करण्याचा संकल्प नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नामवंत क्रीडापटूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. कोविड-19 हे संपूर्ण मानवतेसाठी निर्माण झालेले भयंकर संकट आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलावी लागण्यावरून या संकटाची तीव्रता लक्षात येऊ शकेल, असे ... ...

राहुल-श्रेयसची पुन्हा कमाल, भारताचा दुसरा विजय ऑकलंड, 26 जानेवारी : न्यूझीलंडला सहज पराभूत करत टीम इंडियाने प्रजासत्ताक दिनी देशवासीयांना मोठी भेट दिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या राहुल-श्रेयस जोडीने या सामन्यातही आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. राहुलचे नाबाद अर्धशतक (५७ धावा) आणि श्रेयस अय्यरची ४४ धावांची खेळी निर्णायक ठरली. या दोघांच्या खेळीमुळे भारताने १३२ धावांचे आव्हान सहज पार केले. टीम इंडियाने हा सामना ७ विकेट आणि १५ चेंडू राखत जिंकला. शिवम दुबे ८ धावांवर नाबाद राहिला. त्याने विजयी षटकार लगावला. कोहली ११ धावा आणि रोहित शर्मा ८ धावांवर बाद झाले. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने २ तर सोधीने १ विकेट घेतली.  भारतीय संघाला आतापर्यंत न्यूझीलंडच्या मैदानावर सलग दुसऱ्या विजयाची नाेंद करता आली नव्हती. आता हीच अपयशाची मालिका टीम इंडियाने खंडित केली. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या गोलंदाजीसमोर 20 षटकांत न्यूझीलंडने 132 धावा केल्या. भारताने हे आव्हान 17.2 ... ...

खेळामुळे निर्माण होणार्‍या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा :  मोराळे स.भु क्रीडा महोत्सव समारोप सोहळा  औरंगाबाद  : ग्रामीण भागातील मुलांमध्ये काटकपणा आणि लवचिकता असते. कारण शहरी मुलांच्या तुलनेत ते निसर्गाच्या जास्त जवळ असतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स.भु. ने ही अतिशय चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. ही अतिशय चांगली अशी बाब आहे. मी स्वतः खेळाडू असल्याने मला त्यातील गुणांचा उपयोग प्रशासन सांभाळताना झाला असे क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी प्रतिपादन केले. क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. यशस्वी खेळाडूंची नावे शाळेच्या फलकावर लावण्यात यावीत ज्यामुळे पालकाचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल असे त्या पुढे मिळाल्या. खेळामुळे निर्माण होणार्‍या संधीचा लाभ घेवून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळात स्वतःला झोकून द्यावे असेही त्या ... ...

सानिया मिर्झाच्या बहिणीचा या क्रिकेटरच्या मुलाशी विवाह टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा विवाहबंधनात मुंबई : टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा विवाहबंधनात अडकली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनच्या मुलासोबत तिचा विवाह झाला आहे. अनम आणि असद यांनी एकमेकांना आपला जीवनसाथी म्हणून निवडलं आहे. अनम मिर्झा आणि असदने विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनम आणि असदच्या ग्रँड वेडिंगला कुटुंबातील लोकं आणि मित्र परिवार उपस्थित होता. असदसोबत अनमचा हा दुसरा विवाह आहे. याआधी अनमने बिझनेसमन अकबर रशीदसोबत २०१६ मध्ये विवाह केला होता. पण त्यांचं नातं जास्त दिवस टिकू शकलं नाही. त्यानंतर अनमने अकबर रशीदला घटस्फोट दिला होता. असद आणि अनम गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. त्य़ांचे अनेक फोटो देखील समोर आले होते. सानिया मिर्झाने देखील असद कुटुंबाचा भाग असल्याचं म्हटलं होतं.आयपीएलच्या १२व्या मोसमात ... ...

भारताचा वेस्टइंडिजवर दणदणीत विजय हैदराबाद :विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावा आणि लोकेश राहुलच्या ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादमधील मैदानात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने पाहुण्या विंडीजचा ६ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या कोहलीने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार खेचत विराटने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विंडीजने दिलेले २०८ धावांचे लक्ष्य भारताने ८ चेंडू आणि ६ गडी राखून पार केले.     सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करुन बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी रचली. ४० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६२ धावांचे योगदान देऊन लोकेश राहुल तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऋषभपंतने दोन षटकाराच्या मदतीने ९ चेंडूत १८ धावा करुन ... ...

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या साखळी फेरीत औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुंबई संघ दाखल नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या तिस-या दिवशी ... ...

पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धाः नांदेड, नागपूर, सोलापूर संघाची आघाडी नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये मॅटवर आयोजित करण्यात आलेल्या पश्विम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसी ०३ डिसेंबर रोजी झालेल्या बादफेरीच्या सामन्यात यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने दुसरा विजय मिळवून आघाडी घेतली. तसेच नागपूर, सोलापूर, गडचिरोली, गोवा, अजमेर या विद्यापीठ संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून स्पर्धेत आघाडी घेतली. दि.०३ डिसेंबर रोजी यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने भावनगरच्या कृष्ण कुमार विद्यापीठाच्या संघाच्या २७x२ असा एकतर्फी विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात सोलापूरच्या पुण्यस्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर विरुध्द सरदार पटेल विद्यापीठ, गुजरात ही लढत अतीतटीची होऊन सोलापूर संघाने ... ...