त्या  महिलेचे  मानसिक संतुलन बिघडले  आहे-अनुराधा पौडवाल मुंबई  : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा दावा केरळमधल्या एका महिलेनं केलाय. करमाला मोडेक्स असं त्यांचं नाव असून त्या 45 वर्षांच्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागितलीय. या दाव्यावर अनुराधा पौडवाल या भडकल्या आहेत. केवळ प्रसिद्ध मिळविण्यासाठी या महिलेने हे आरोप केले आहेत. त्यांना पैसे उकळायचे असून त्यासाठीच त्यांनी हे आरोप केलेत. या महिलेचं मानसिंक संतुलन बिघडलं आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. अनुराधा पौडवाल म्हणाल्या, माझ्या कविता या मुलीचा जन्म 1997 सालचा आहे. एखादा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा करू शकत नाही. कोर्टाने नोटीस पाठविण्याच्या कृतीवरही त्यांनी शंका व्यक्त केली. कोर्टाने कुठल्या ... ...

रंगभूमीचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू कालवश  पुणे 17 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते.मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामना', 'सिंहासन', 'पिंजरा' यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'नटसम्राट' या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. मराठी चित्रपटाशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातूनही आपल्यातील अभिनयाचा ठसा उमटवला. अत्यंत अभ्यासू आणि विचारी अभिनेता अशी त्यांची ओळख होती.  रंगभूमीवरील घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ... ...

  जब दुआ लिपा मेट एसआरके... इंग्लंडची पॉपस्टार दुआ लिपाचे आज भारतात आगमन झाले. मुंबईत होणाऱ्या ‘वनप्लस म्युझिक फेस्टिवल’ या म्युझिक कॉन्सर्टसाठी ती भारत दौऱ्यावर आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ती परफॉर्म करणार आहे. दुआ लिपाने भारतात आल्यावर पहिली किंग खानची भेट घेतली. दुआ ऐअरपोर्टवरून थेट मन्नतवर जाऊन शाहरुख खानला भेटली. शाहरुख खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.मुंबईमध्ये होणाऱ्या या म्युझिक कॉन्सर्टमध्ये दुआ लिपा, पॉपसिंगर केटी पेरीसह परफॉर्म करणार आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये भारतीय गायक आणि गीतकार अमित त्रिवेदीही परफॉर्म करताना दिसणार आहे. ...

माधुरी पुन्हा म्हणणार ‘एक, दो, तीन...’ माधुरी दीक्षितने 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षं पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. यात ती तिच्या लोकप्रिय 'एक दो तीन' या गाण्यावर थिरकताना दिसली. Madhuri Dixit Nene✔@MadhuriDixit Ek Do Teen... has been a really special song for me. So today, I'm celebrating #31YearsOfTezaab with a fun dance challenge on @TikTok_IN. Match my steps & share your videos using #EkDoTeenChallenge ...

जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या स्वछंद  कवितांनी रंगला आयुष्यावर बोलू काही औरंगाबाद, दि.८ आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या स्वछंद कविता सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमानाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी "आयुष्यावर बोलु काही" हा बहारदार कार्यक्रम तापडिया नाट्य मंदिरात सादर केला. जिल्हा गणेश महासंघ, उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन औरंगाबाद हुंहे अन्वेषण विभागाच्या अधिक्षीका लता फड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ, प्रभाकर विधाते, कार्याध्यक्ष अनिकेत पवार, मिथुन व्यास, संदीप शेळके, आदींची उपस्थिती होती. दमलेल्या बाबांची कहाणी सांगत संदीप खरे यांच्या कवितांना ... ...

प्रायोगिक रंगभूमीची वास्तू राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल - विनोद तावडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार प्रदान मुंबई दि. 15: राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा काल संध्याकाळी यशवंत नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती दया डोंगरे यांना जाहीर झाला होता. प्रकृती कारणास्तव ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्येष्ठ नाट्य ... ...

५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित मुंबई : ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.   अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर, फायरब्रँड,बंदीशाळा, आम्ही दोघी, एक सांगायचय, अनसेड हार्मोनी, तेंडल्या, भूर्जी, चुंबक या दहा चित्रपटांचे उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. तर घोषित पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी नरेंद्र हळदणकर (बंदीशाळा), उत्कृष्ट छायालेखनासाठी सुधीर पळसाने (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट संकलनासाठी नचिकेत वाईकर (तेंडल्या), उत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी गंधार मोकाशी (आणि डॉ.काशिनाथ घाणेकर), उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी मंदार कमलापूरकर (पुष्पक विमान), उत्कृष्ट वेशभूषासाठी ... ...