जागतिक तापमान वाढ, हवामान आणि ऋतू बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण विश्वात पर्यावरण, संवर्धन आणि संरक्षण यावर आधारित विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या अंतर्गत यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्र शासनाने 2 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला. यात शासनाच्या विविध विभागांबरोबरच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, एन.एस.एस., एन.सी.सी.स्काऊट न्ड गाईडस्, अशासकीय, स्वयंसेवी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, औद्योगिक समूह, सीएसआर, लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण संस्था, सहकारी संस्था, शासकीय कर्मचारी/अधिकारी इत्यादींचा देखील सहभाग होता. लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 2 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट सहजगत्या पूर्ण झाले. 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी 82 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन कि बात" या कार्यक्रमातून 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड ... ...

नुकतेच संसदेचे हिवाळी अधिवशेन दिल्लीत पार पडले. त्याच काळात महाराष्ट्रात नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही सुरू होते. या दोन्ही अधिवेशनाचा सारासार विचार केल्यास  देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न नोटाबंदीनंतर निर्माण झाले होते. त्या मुद्यावर संसदेत विरोधक सरकारवर तुटून पडले खरे परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने केंद्र सरकारवर त्याचा कुठलाच परिणाम झालेला नाही. त्यांनी विरोधकांना गोंधळ करू देऊन वेळ मारून नेली. या अधिवशेनावर जवळपास दोनशे कोटी रूपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच संसदेच्या हिवाळी अविधशात अनेक महत्वाची विधयेक होती ती मंजूरी आणि चर्चेविना अपूरी राहीली आहेत.यावेळी संसदेच्या वरिष्ठ कार्यालयात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली मात्र ती केवळ सात मिनिटे त्यातून त्यांनी नेमके काय सांगितले हे लोकांपर्यंत गेलेले नाही. त्यातच कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहूल गांधी यांनी संसदेच्या अधिवशेनापासूनच आपण नोटाबंदीवरून सरकारला चांगलेच कात्रीत पकडू असा ... ...

नोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकारण्यांचे कुरण अशी कुख्यात ओळख असलेल्या बॅंकांना अर्थात जिल्हा बॅंकांना रद्दबातल हजार आणि पाचशेच्या नोटा स्विकारण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे देशातील आणि त्यासोबतच राज्यातील सुमारे 31 जिल्हा बॅंकांच्या 3 हजार 800 शाखा ह्या नोटाबंदीच्या वादळात सापडल्या होत्या. राज्यातील जिल्हा बॅंकांच्या खातेदारांची संख्याही मोठी आहे. मात्र, या बॅंकांवर केवळ राजकीय मंडळीचे वर्चस्व असून, नोटाबंदीचा निर्णय लागु झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसातच राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये रद्द झालेल्या पाचशे व हजाराच्या नोटांच्या माध्यमातून तब्बल 5 हजार कोटींची रक्कम जमा झाली होती. इतकेच नव्हे तर परपराज्यात तसेच केरळ, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही जिल्हा बॅंकेत जमा होणाऱ्या रकमेचा आकडा डोेळे दिपवणारा होता. त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल घेत केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा स्विकारण्यावर जिल्हा बॅंकांसाठी निर्बंध लागु केले आणि या बॅंकेची निगडीत असलेल्या प्रत्येकाचेच धाबे दणाणले होते. ... ...

गत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या मोर्चांना राज्यात आणि राज्याबाहेर विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. तथापि, सरकारने अनेकदा चर्चेची तयारी दाखविलीत होती. परंतू, नेमकी चर्चा कोणाशी करावी, असा प्रश्न कायम होता. त्यातच 14 डिसेंबर रोजी नागपुर येथे निघालेला राज्यस्तरीय मोर्चाने आंदोलनाला एक नवी दिशा दिल्याचे दिसून येत आहे. हा राज्यस्तरीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडणारा मोर्चा ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे  या मोर्चाच्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने विविध मागण्यासंदर्भात सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे. विशेषत: नागपूरनंतर मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि ... ...

शूर सैनिक जो प्राणपणाने भारत मातेच्या रक्षणार्थ स्वत:चे बलिदान करतो. शारीरिक व मानसिक यातनांकडे व वेदनांकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त देशाचे स्वातंत्र्य, एकता व गौरव अबाधित राखण्यासाठीच झुंज देतो. वयाच्या 35-40 व्या वर्षी तो सेवानिवृत्त होतो. प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळ-जवळ 70 हजारांहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी 9-10 हजार सैनिक महाराष्ट्रातील असतात. त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते. निवृत्ती वेतनात घर चालवणे, पाल्यांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वृध्द माता-पित्यांचा सांभाळ हे सर्व करत असताना त्याची तारेवरची कसरत होत असते. या परिस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाची जबाबदारी व त्यांचे पुनर्वसन सैनिक कल्याण विभागाद्वारे पार पाडली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. याकरिताच सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी सशस्त्र दल ध्वजदिन निधी संकलन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात देशभर राबवला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ही संकल्पना तशी खूप जुनी आहे. ब्रिटीश ... ...

नोटबंदीने देशाचे चित्र पालटले आणि भविष्यही उज्वल होईल याची शाश्वती निर्मान झाली .त्रास होतोय पण ,निर्णय चांगला आहे.या सर्वसाधारण प्रतिक्रिया आहेत, या परिस्थितीत आपला विरोध उठून दिसला पाहिजे यासाठी विरोधकांचा आक्रोश सुरु आहे.पण हा आक्रोश त्यांच्या पुरताच मर्यादित असल्याची परिस्थिती आहे. नोटबंदीची किमया आताशा दिसून येऊ लागली आहे. सत्ता स्थापने नंतर पंतप्रधान मोदींनी देशातील सामान्य जनतेचे खाते बॅंकेत उघडण्याची मोहीम सुरु केली.त्यावेळी हा काय प्रकार असेच वाटत होते.परंतु मोदींचा हा निर्णय किती दूरदर्शी होता हे आता एव्हाना सर्वानाच पटले असावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींनी स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणून भारतातील गरिबांच्या खात्यात पंधरा- पंधरा लाख रुपये जमा करू असे आश्वासन दिल्याच्या वलग्ना विरोधानी केल्या.सामन्यांमध्ये सरकारची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही.उलट पक्षी या आणि अश्या मुद्यांचा वापर विरोधकांनी सरकार विरोधातील भांडवल म्हणूनच केला आहे.विरोधकांजवळील हे भांडवल आता ... ...

स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी. निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यामधला  वर्ष कालावधीचा पदवी अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केला आहे. अमरावती येथे तसेच सध्याच्या सह्याद्री हॉस्पीटलमध्ये देखील मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.  पासून त्यांनी स्वत:ची प्रॅक्टीस सुरू केली असून मानसिक आजाराविषयी जनजागृती करणे हे त्यांचं ध्येय आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमातून त्यांच्याशी साधलेला हा संवाद.  काही माणसांना हात नसतात तर काहींना पाय नसतात. पण मन मात्र सर्वांनाच असतं. आणि तुम्ही  मनाचे डॉक्टर आहात.  ► सर्वांनी आपल्या मनाला कसं सांभाळलं पाहिजे.? जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या ... ...