मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा करातून एकूण 97,597 कोटी रूपयांचा महसुल प्राप्त नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2020  2020  च्या मार्च महिन्यात  वस्तू आणि सेवा करातून  एकूण 97,597 कोटी रूपयांचा  महसुल प्राप्त झाला आहे.यामध्ये 19,183 कोटी रुपयांचा सीजीएसटी, 25,601 कोटी रुपयांचा एसजीएसटी,44,508 कोटी रुपयांचा आयजीएसटी(आयातीवरील 18,056 कोटी रुपयांसह)  आणि 8,306 कोटी  रुपयांच्या(आयातीवरील 841 कोटी रुपयांसह)  उपकराचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत 76.5 लाख जीएसटीआर-3 बी विवरणपत्रे दाखल झाली आहेत.           State-wise GST Collections during March 2020 State Mar-19 Mar-20 Growth 2018-19 2019-20 Growth Jammu and ... ...

मासिक हप्त्याची रक्कम विलंबाने देण्यासंदर्भात रिझर्व बँकेने, बँकांना दिलेल्या परवानगी संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020 खेळते भांडवल विषयक सुविधा आणि 1 मार्च 2020 रोजी देय असलेल्या सर्व मुदत कर्जावरचे हप्ते तीन महिने विलंबाने देण्यासंदर्भात रिझर्व बँकेने, गेल्या आठवड्यात घोषणा केली.  या संदर्भातल्या तांत्रिक बाबींविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या  प्रश्न आणि शंकांचे भारतीय बँकेने एका “वारंवार विचारले जाणारे प्रश्न” ने निराकरण केले आहे.  प्रश्न 1 – आरबीआयची घोषणा काय आहे आणि केव्हा केली होती ?  उत्तर- खेळते भांडवल विषयक सुविधा आणि 1 मार्च 2020 रोजी देय असलेल्या सर्व मुदत कर्जावरचे हप्ते तीन महिने विलंबाने वसूल करण्याबाबत रिझर्व बँकेने, बँकांना गेल्या आठवड्यात परवानगी दिली.    प्रश्न 2- आरबीआयने  दिलासा देणारे  हे पॅकेज का जाहीर केले ... ...

कर्जाचे हफ्ते ३ महिने स्थगित  रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांकडून सर्व समावेशक पॅकेज जाहीर नवी दिल्ली :कोरोनामुळे देशावर उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आरबीयकडून एक पाऊल पुढे पाहायला मिळत आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये ०.७५ टक्के कपात केल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. कोरोनामुळे जीडीपीवर परिणाम होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरबीआयने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात आरबीआयकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  रिझर्व बँकेने रेपो दरात 75 बेसीस पॉंईंटसनी कपात  केल्यामुळे हा दर आता 4.4 % झाला आहे तर रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस  पोईटची कपात करत हा दर 4 % झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 28 मार्च पासून एक वर्षासाठी सर्व बँकांसाठी राखीव-रोखता ... ...

ईएमआय स्थगितीच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांवर दबाव ठेवण्याची मागणी   मुंबई, दि. 27 मार्च 2020 : ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करून त्यांच्यावर दबाव ठेवण्यात यावा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.   रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, शेतकरी, व्यापारी, उद्योजकांनी व्यवसायासाठी घेतलेली विविध कर्जे, कॅश क्रेडिट आणि ओव्हर ... ...

रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी ‘सल्ल्या’ऐवजी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची अपेक्षा मुंबई, दि. 27 :- ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री  अजित पवार यांनी निर्णयांचे स्वागत केले आहे. मात्र, देशातील बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.   ‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता ... ...

नवी व्यक्तिगत आयकर रचना करदात्यांना विशेषतः मध्यमवर्गीयांना भरघोस दिलासा देणारी नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2020 व्यक्तीगत करदात्यांना भरघोस सवलत मिळावी आणि आयकर कायद्याच्या तरतुदी सोप्या व्हाव्यात म्हणून अर्थसंकल्पात एका नव्या आणि सोप्या आयकर प्रणालीचा प्रस्ताव केला आहे. नव्या पध्दतीने आयकर भरणे हा एक पर्याय ठेवला गेला आहे. पर्याय स्विकारणाऱ्यांना आयकरातील सवलती आणि वजावटी सोडाव्या लागतील. अंदाजपत्रक मांडताना अर्थ मंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की ज्यांना सध्याच्या व्यवस्थेत अधिक सवलती मिळतात ते जुनी पद्धत स्विकारु शकतात. नव्या वैयक्तिक आयकरात खालील पध्दतीने कर आखला जाईल: करपात्र उत्पन्न (रुपयात) सध्याचे आयकर दर नवे आयकर दर 0-2.5 लाख -- -- 2.5-5 लाख 5% 5% 5-7.5 लाख 20% 10% 7.5-10 ... ...

केंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि दिशाचा अभाव - शरद पवार मुंबई : सर्वात मोठे बजेट भाषण होते. दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केली. रोजगार निर्मिती आणि विकासासाठी ठोस काहीच नाही. बेरोजगारीच्या प्रश्नाकडे योग्यप्रकारे लक्ष दिले गेलेले नाही. हे सर्वात लांब भाषण होते. परंतु त्यामध्ये दूरदृष्टी आणि दिशा देण्याचा अभाव होता. तर ऑटोमोबाईल क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. या अर्थसंकल्पात कृषी गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु दुप्पट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दूरदृष्टी आणि स्पष्टतेचा अभाव आहे. हे अजूनही एक दूरचे स्वप्न दाखविण्यात आले आहे, असे पवार म्हणालेत. त्याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. निराशाजनक आणि गोंधळात टाकणारे बजेट सादर केले आहे, असे राहुल गांधी म्हणालेत. महाराष्ट्र आणि मुंबईची घोर ... ...