कायदा करून राम मंदिर बनवावे – उद्धव ठाकरे अयोध्या –  शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उद्या शिवसेनेच्या १८ नवनिर्वाचित खासदारांसह  अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं  लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत अयोध्येचा दौरा केला आहे. दरम्यान, रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे. पहिले मंदीर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत असं त्यांनी सांगितले. दुष्काळामध्ये शिवसेनेने पक्ष म्हणून काम केले आहे, त्याच्या अर्धे काम तरी आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी (विरोधकांनी) केलं आहे का ? इथे मंदीर व्हावं ही लोकांची ... ...

संसदेचे आजपासून अधिवेशन : विरोधक अजूनही पराभवाच्या धक्क्यातच  नवी दिल्ली : १७व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि शपथविधी सोहळाही पार पडला. आता सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास शिल्लक असताना विरोधकांमध्ये संभ्रम कायम आहे.सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र विरोधी पक्षांकडून अशा प्रकारचे कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकते, असे राज्यसभा खासदार पी. एन. पुनिया यांनी सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे विरोधी पक्षांच्या आत्मविश्वासाला प्रचंड धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष अद्याप पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे संसदेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याची पुरेशी तयारीही विरोधी पक्षांनी केली नसल्याचे चित्र दिल्लीत ... ...

  राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई, दि. १५: जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे आभार मानले.       राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या प्रशासकीय समितीची ५ वी बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, गृहमंत्री अमित शहा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ व रस्ते वाहतूक तथा सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग ... ...

नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट   नवी दिल्ली, दि. 15 : केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील श्रमशक्ती भवनात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर श्री. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.   राज्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये नदी जोड प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भूमिका असून केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून गोदावरी खोऱ्यात ... ...

जलियाँवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण नवी दिल्ली : जलियाँवाला बाग हत्याकांडाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. १३ एप्रिल १९१९ साली ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराजवळ असलेल्या जलियाँवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करत, हजारो नागरिकांचा जीव घेतला होता. भारताच्या इतिहासातील ही सर्वात दुःखद घटना ठरली असली तरी या घटनेने ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा क्रूर चेहरा जगासमोर आला. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या नागरिकांना स्मरण करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलियाँवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत, या हत्याकांडात शहीद झालेल्या पराक्रमी नागरिकांचे बलिदान कधीच विसरले जाणार नसल्याचे म्हटले. या वीरांचे स्मृतिस्थळ देशासाठी एक प्रेरणास्थान असून त्यांना अभिमान वाटेल असा भारत घडविण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रेरित करत ... ...

मसूद अजहर ‘जी’! राहुल गांधींची मुक्ताफळे   नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेविषयी आणि तिचा म्होरक्या मसूद अझहरविषयी देशभरात उसळलेली संतापाची लाट अजूनही शमलेली नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी मात्र या दहशतवाद्याचा उल्लेख आदरार्थी करत आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या एका सभेत राहुल यांनी मसूद अझहरचा उल्लेख चक्क ‘मसूद अझहरजी’ असा केला. राहुल गांधींच्या या मुक्ताफळांचा देशभरातील अनेक नागरिकांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे.   सोमवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या झालेल्या एका मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित याही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. राहुल यांनी आपल्या भाषणाद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावेळी पुलवामा ... ...

रमजानच्या महिन्यात निवडणुकीला मुस्लिम धर्मगुरुंचा विरोध   नवी दिल्ली : रविवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. ही निवडणूक ७ टप्यांमध्ये होणार असून शेवटचे ३ टप्पे हे रमजानच्या महिन्यात येत आहेत. यामुळे मुस्लीम धर्मगुरुंनी या तारखांना विरोध केला आहे. रमजान महिन्यात मतदान ठेवल्याने मतदानाचा टक्का घसरु शकतो, त्यामुळे शेवटच्या तीन टप्प्यातील मतदानाच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम धर्मगुरुंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यात ६,१२ आणि १९ मे रोजी मतदान होणार आहे. या तीनही तारखा रमजान महिन्यात येतात. या काळात मुस्लिम धर्मियांचा उपवास असतो. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरु शकतो असे मुस्लिम धर्मगुरुंचे मत आहे. त्यामुळे याकाळात मतदान घेऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणूकीचे वेळापत्रक रविवारी ... ...