रामनवमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा; प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव घरीच साजरी करण्याचे आवाहन मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्याला आपल्या घरीच भक्तीभावाने साजरा करायचा आहे. प्रभू रामाचे उन्नत जीवन व उच्च आदर्श मानव जातीला नेहमीच योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देत राहतील. सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे. ...

ब्रह्मकुमारी दादी जानकी स्थितप्रज्ञ व्यक्ती होत्या : राज्यपाल मुंबई दि.२७ - ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख दादी जानकी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ब्रम्हकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक प्रमुख राजयोगिनी दादी जानकी या स्थितप्रज्ञ, संतप्रवृत्तीच्या प्रेमळ व्यक्ती होत्या. दादीजींना प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य मला लाभले. ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक देशात सेवाकार्य केले. अमोघ वाणी लाभलेल्या दादीजींनी देश विदेशातील असंख्य लोकांना उन्नत जीवन जगण्याचा राजमार्ग दाखवला. त्यांचे विचार व प्रवचने मानवजातीला नेहमी मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या निधनामुळे ब्रह्मकुमारी संस्थेची तसेच मानवतेची हानी झाली आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई दि. 27 : प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या ... ...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन मुंबई, दि. 12: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी मान्यवर तसेच कुटुंबीय उपस्थित होते. “राज्यातील दुष्काळ व पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभारी घेण्याचे बळ दे, राज्याच्या जनतेवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी, दुष्काळमुक्तीसाठी राज्य शासनातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समृद्धीचे हास्य घेऊन पुढच्या वर्षी लवकर ये,” असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाला साकडे घातले.   ...

प.पू. स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी महोत्सवास अनंत चतुर्दशीपासून होणार प्रारंभ श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठान, गोरटे(उमरी-नांदेड)द्वारे राज्यात विविध ठिकाणी वर्षभर होणार विविध कार्यक्रम औरंगाबाद: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या गोरटे येथील श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी वरदानंद भारती जन्मशताब्दी महोत्सवास अनंत चतुर्दशी अर्थात १२ सप्टेंबर २०१९ पासून सुरूवात होणार आहे. १ सप्टेंबर २०२० पर्यंत वर्षभर महाराष्ट्र राज्यात व राज्याबाहेर तब्बल ३९ ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीदासगणुमहाराज प्रतिष्ठानच्या सूत्रांनी दिली.  या धार्मिक कार्यक्रमात कीर्तन, पाठ,नाम-जप, ग्रंथ पारायण यासह दैनंदिन पूजाविधींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संतपरंपरा अाधुनिक  काळात अखंडपणे चालू ठेवण्याचे कार्य  श्री दासगणू महाराज  व  स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य ... ...

लो. सेवा संघातील गणेशाला नतमस्तक ; पं. मोदींचा महाराष्ट्र दौऱ्याचा श्रीगणेशा मुंबई : शहरातील विविध मेट्रोमार्गिकांच्या भूमिपूजनासाठी आणि राज्यभरातील अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणरायाला वंदन करून आपल्या दौऱ्याचा श्रीगणेशा केला. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहात आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आ.पराग अळवणी, नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक अभिजित सामंत, नगरसेविका सुनीता मेहता, नगरसेवक अनिष मकवनी आणि मुरजी पटेल उपस्थित होते. मोदी यांनी यावेळी लोकमान्य सेवा संघाच्या सभागृहातील गणपतीचे दर्शन घेतले. गणरायाच्या दर्शनासोबत ... ...

वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल होणार पुणे :  अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे महाराष्ट्र वारीमय झाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व श्री संत तुकाराम पालखी सोहळा या दोन्ही मार्गावर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी प्रदर्शन, पथनाट्य, लोकनाट्य उपक्रम आयोजित केल्या आहेत.   गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, अखंड वीजपुरवठा,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना,मुख्यमंत्री सहाय्यता निधी, बाजार समित्यामध्ये सुधारणा, डिजिटल सात-बारा,उन्नत शेती – समृद्ध शेतकरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा विविध योजनांच्या माहिती वारीच्या ... ...

साईबाबा शताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री उपस्थित राहणार - खासदार सदाशिव लोखंडे नवी दिल्ली,  ६ : शिर्डी येथे आयोजित होणाऱ्या १७१ व्या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवातील नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असून या सप्ताहास प्रधानमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी  दिली.   श्री. लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज संसद भवन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी १७१ व्या साईबाबा समाधी शताब्धी महोत्सवानिमित्त दिनांक १६ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान शिर्डी येथे आयोजित सद्गुरु गंगागिरी महाराज नाम सप्ताहाचे निमंत्रण प्रधानमंत्री ... ...