पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोनाविरुध्द लढा देताना देशाच्या नागरिकांना केलेले संबोधन माझ्या  प्रिय देशबांधवांनो, कोरोना या जागतिक महामारी विरोधातील देशव्यापी लॉकडाउनला आज 9 दिवस पूर्ण होत आहेत.  या काळात तुम्ही सर्वानी ज्याप्रकारे शिस्त आणि सेवा भाव या न्हींचे दर्शन घडवले आहे ते अभूतपूर्व आहे. सरकार, प्रशासन आणि जनता जनार्दन यांनी एकत्रितपणे ही परिस्थिती उत्तम प्रकारे सांभाळण्याचे भरपूर प्रयत्न केले आहेत.  तुम्ही ज्याप्रकारे  रविवार 22 मार्च ,रोजी कोरोना विरोधात लढाई लढणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले, ते देखील आज सर्व देशांसाठी एक उदाहरण बनले आहे.  आज अनेक देश त्याचे अनुकरण करत आहेत. जनता कर्फ्यू असेल, घंटानाद असेल, टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम असेल, यातून या आव्हानात्मक काळात देशाला या सामूहिक सामर्थ्याची  जाणीव करून दिली. , देश एकत्र येऊन कोरोना विरोधात लढाई लढू शकतो ही भावना ... ...

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि वैद्यकीय उपचाराने कोरोनामुक्ती केली साध्य,प्राध्यापिकेची यशकथा मराठवाड्यातील पहिली कोरोना बाधित रुग्ण असलेल्या  औरंगाबादच्या ५९ वर्षीय महिला प्राध्यापिकेने दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांनी, डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करत कोरोनापासून मुक्ती मिळवली आहे. “बरं होण्याची तीव्र इच्छा आणि आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने, सर्वांच्या शुभेच्छांमुळे कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याची ही अटीतटीची लढाई मी यशस्वीरित्या लढू शकले ”,  अशी कृतज्ञतेची भावना कोरोनामुक्त महिला प्राध्यापिकेने व्यक्त केली आहे. खाजगी कामानिमित्त परदेशातून परततांना दिल्ली विमानतळावर तीन ते साडेतीन तास थांबून मग औरंगाबादला दि. ३ मार्च रोजी वापस आलेल्या या प्राध्यापिकेने नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये जाणे, आपले दैनंदिन काम करणे सुरु केले. कोरोनाग्रस्त असल्याचे  आपल्याला कसे कळाले, याबाबत त्यांनी सांगितले की, ... ...

प्रशासन आमची घरच्या सारखी काळजी घेत आहे.... मुकुंद चिलवंत कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांना काम नसल्यानं ते आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य देत आहेत.  औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर देखील काही नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना बीड बायपास रोडवरील यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय येथील शासकीय निवाऱ्या मध्ये ठेवलं आहे. आजपर्यंत जवळपास 105 मजुरांना या शासकीय निवाऱ्यात ठेवण्यात आलं असून त्यांना पूर्ण सोयी सुविधा प्रशासन पुरवत आहे. हे सर्व मजूर पुणे येथील लोहगाव येथे मोलमजुरी करून गुजराण करणारे आहेत. हे मजूर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील जबलपूर या जिल्ह्यातील आहेत. यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर बाणापुरे आणि तलाठी योगेश पंडित यांची नियुक्ती केली आहे. या ... ...

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव! माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला  आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या. कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरं म्हणज सुरूवातीला थोडं टेन्शन आलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला ... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण नवी दिल्ली, 24 मार्च 2020 नमस्कार!! माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज पुन्हा एकदा, कोरोना वैश्विक महामारीविषयी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आलो आहे. दि. 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा आपण सर्वांनी ‘एक राष्ट्र’ म्हणून जो संकल्प केला होता, तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक भारतवासियाने अगदी संवेदनशीलपणानं आणि संपूर्ण जबाबदारीनं आपलं योगदान दिलं. अबालवृद्ध, लहान, मोठे, ज्येष्ठ नागरिक,गरीब, मध्यम, प्रत्येक वर्गातले लोक, अगदी सर्वच्या सर्व लोक या कठीण परीक्षेच्या काळात एक झाले. जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतवासियाने यशस्वी बनवलं. एका दिवसाच्या जनता कर्फ्यू द्वारे भारताने दाखवून दिलं की, ज्यावेळी देशावर संकट येतं, ज्यावेळी मानवतेवर संकट येतं, त्यावेळी आम्ही सर्व भारतीय मिळून, एकजूट होतो. कशा प्रकारे त्या आपत्तीला तोंड देतो, हे आपण सर्वांनी ... ...

लोकनायक उद्धव बाळासाहेब ठाकरे सामाजिक कामांच्या माध्यमातून शिवसेनेला `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड` मध्ये पोहोचविण्याचे काम केले ते उद्धव ठाकरे यांनीच. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख जसे `लोकमान्य` बनले तसेच उद्धव ठाकरे हेही आपल्या कामातून विश्वविक्रमी `लोकनायक` बनले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी पक्षाबाहेर अनेक मतमतांतरे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा वारसा ते समर्थपणे चालवू शकतील का, असाही प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. बाळासाहेबांचा आक्रमक स्वभाव, त्यांचे आक्रमक भाषण करून विरोधकांना नामोहरम करून टाकण्याची शैली, या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत असे मानणारा एक वर्ग आहे. स्वत: उद्धव ठाकरे हेही आपण शिवसेनाप्रमुखांसारखे भाषण करू शकत नाही हे मान्य करतात. बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व हे शतकातून एखाद्यावेळीच जन्माला येते त्यामुळे त्यांच्यासारखे दुसरे कोणी असूच शकत नाही, असे स्पष्टपणे ते सांगतात. मग उद्धव ठाकरे ... ...

त्या तिघांचं सरकार  संयम, निर्धार आणि चिकाटी दाखवली की काय घडतं ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. भाजपला दूर सारत महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात उद्या स्थापन होत आहे. शिवाजी पार्कवर उद्या शपथविधी होईल आणि तिघाचं सरकार महाराष्ट्राला मिळेल. तिघांचं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं नाही. तिघांचं म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांचं. या तिघांशिवाय अन्य कुणालाही या सरकारचं श्रेय देता येणार नाही. काँग्रेसचे गटनेते खुद्द बाळासाहेब थोरात यांनी परवा कबुली दिली की संजय राऊतांशिवाय हे सरकार येणं शक्यच नव्हतं. संजय राऊत यांची एकहाती लढाई होती. किती दडपण असेल त्यांच्यावर. लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल होत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमधले दोन ब्लॉक त्यांनी काढून घेतले. पण पुढे वाढून ठेवलेले दोन मोठे राजकीय ब्लॉकही दूर करण्यात त्यांना यश मिळालं. ते मिळालं नसतं. तर काय झालं असतं? कल्पना करता येणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या या ... ...