जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) एप्रिल -2020 पुढे ढकलली नवी दिल्ली, 31 मार्च 2020 राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 5, 7 ते 9 आणि 11 एप्रिल  2020 रोजी होणाऱ्या जेईई (मुख्य) एप्रिल 2020 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत, दिनांक 18.03.2020 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक अधिसुचने च्या अनुषंगाने एनटीएने आज अधिसूचित केले आहे की, सध्या तरी ही परीक्षा  मे २०२० च्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. आगामी काळात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नेमकी तारीख जाहीर केली जाईल. लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतांना एनटीएने म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत वेळापत्रकात काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यानुसार निर्णय घेण्यासाठी एनटीए परिस्थितीवर बारीक  लक्ष ठेवून आहे. त्यानुसार, त्यावेळच्या परिस्थितीच्या आधारे आता 15 एप्रिल  2020  नंतर परीक्षेसाठी प्रवेशपत्रे ... ...

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज होण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा चौतीसावा पदवीप्रदान समारंभ अहमदनगर, दि. ५ : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा एकदा त्या संपन्न वारशानुसार अनुकरण करण्याची गरज आहे. कृषी, विज्ञान क्षेत्रात पुन्हा भरारी घेऊन जगाचे नेतृत्व करण्यासाठी नव्या पिढीने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी कृषि पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.    ...

महाराष्ट्र स्टार्ट अपमधील आघाडी टिकवून ठेवेल - कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांचा विश्वास मुंबई, दि. 1 : राज्यातील संसाधनाचा उपयोग करण्यासाठी स्टार्ट अप काम करत असून येणाऱ्या काळात स्टार्ट अप एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजही सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात येत असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र स्टार्ट अपमधील आघाडी टिकवून ठेवेल असा विश्वास कौशल्य विकास आणि उदयोजकतामंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी व्यक्त केला. राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला होता. येथील हॉटेल विवांता येथे स्टार्ट अप सप्ताहाचा सांगता समारंभ कार्यक्रम पार पडला. त्यावेळी श्री. निलंगेकर यांनी स्टार्ट ... ...

बेरोजगार तरूणांसाठी खुशखबर ‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे मिळतील नोक-या नवी दिल्ली – केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत-राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन’ लागू केल्यास कमीत कमी 10 हजार रोजगार उपलब्ध होतील. या योजनेचा उद्देश 10 कोटी गरीब कुटुंबियांना प्रति कुंटुंब प्रति वर्ष पाच लाख रूपयेे सुरक्षा देणे आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार योजनेकरिता खाजगी आणि सरकारी अशा रूग्णालयात एक लाख आयुष्यमान मित्रांची निवड केली जाणार आहे. ते आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.आरोग्य मंत्रालयाने एक लाख आयुष्यमान मित्र यांच्या भरतीसाठी कौशल्य विकास मंत्रालयासोबत एक करार केला आहे. ...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अनुदीप दृशेट्टी पहिला नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१७ साली घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात अनुदीप दृशेट्टीने पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण २०२५ गुणांपैकी ११२६ गुण मिळवत ५५.६०% आकडेवारी गाठली आहे. यात ९५० लेखी परीक्षेत तर १७६ मुलाखतीत हे गुण मिळालेले आहेत.   या परीक्षेत अनु कुमारीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिला लेखी परीक्षेत ९३७ तर मुलाखतीत १८७ गुण मिळाले असून एकूण ११२४ गुण मिळविण्यात यश आले आहे. यात तृतीय क्रमांक पटकावलेला सचिन गुप्ता याला ११२२ एवढे एकूण गुण मिळाले आहेत. लेखी परीक्षेत ९४६ तर मुलाखतीत १७६ अशी गुणसंख्या आहे. जून २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत एकूण ९ लाख ५७ हजार ५९० परीक्षार्थनी अर्ज केला होता, पैकी ४ लाख ५६ हजार ६२५ प्रत्यक्ष सहभागी झाले ... ...

महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ५ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले   आज सह्याद्री अतिथीगृहात चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या कामाचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. बैठकीस कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, चंद्रपूर जिल्हाधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते   महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ कायद्याचा मसुदा 15 मे पर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, कौशल्य विकासाशी संबंधित अभ्यासक्रमाचीही या दरम्यान निश्चिती केली जावी. कौशल्य ... ...

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात प्रथम ! पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) परीक्षेत पुण्याच्या श्रुती विनोद श्रीखंडे ही   देशात प्रथम आली आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी असून तिने पुण्यातून लॉमध्ये शिक्षण घेतले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. तोंडी आणि लेखी परीक्षा असे या परीक्षेचे स्वरूप असते. या परीक्षेत श्रुतीने बाजी मारली आहे. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) तिला प्रवेश मिळणार आहे. सीडीएसमध्ये लेखी परीक्षा व मुलाखत हे दोन टप्पे असले तरी शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग आहे. एप्रिल २०१८ पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता ... ...