'मिसेस' मुख्यमंत्र्यांना ट्रोल करणाऱ्यांची खैर नाही...   मुंबई : गड-किल्ल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना समाजमाध्यमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर पसरविणाऱ्यांविरोधात राज्य महिला आयोगाकडे बुधवारी अखेर तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार सोमेश कोलगे यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनंतर अमृता फडणवीस यांच्याबाबत समाजमाध्यमांवर तक्रार दाखल करणाऱ्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याच्या हेतूने राज्य सरकारने 'वर्ग-२'मधील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. याबाबत गैरसमजुतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले सरकार विकायला निघाले, असा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर सरकारवर टीका करताना काही जणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ... ...

महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ती’पुरस्काराने गौरविण्यात आले.   केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या देशभरातील ४४ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी,केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.       महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले.   ‘नारी ... ...

'तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस' या नवीन उपक्रमाची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून घोषणा मुंबई, दि. 1 : मानव विकास कार्यक्रमांतर्गत समाजातील अतिगरीब, कर्ज पीडितांना व महिलांना तसेच महिला आधारित कुटुंबाना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी 'तेजश्री फायनान्शियल  सर्व्हिसेस' या नवीन उपक्रमाची घोषणा करीत असल्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृहात नियोजन विभाग आणि  राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगटांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. परिषदेस कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे,  नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती,  कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीम दासगुप्ता यांच्यासह ... ...

‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’ योजनेचा शुभारंभ बालमृत्यू, कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीने योजना महत्त्वपूर्ण ठरेल - महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे   मुंबई, दि. 29 :  बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता ब्लँकेट, मच्छरदाणी, छोटा नेलकटर,इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, झोपण्याची लहान गादी, प्लास्टिक लंगोट, हातमोजे,पायमोजे इत्यादी साहित्याचा समावेश असणारे ‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’देण्यात येणार आहे. या योजनेचा आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. नुकत्याच साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे किट मोफत देण्यात येणार आहे. मंत्रालयात आज झालेल्या कार्यक्रमात ... ...

शबरीमला: सॅनिटरी पॅड घेऊन मंदिरात जाणे कितपत योग्य? स्मृती इराणींचा प्रश्न नवी दिल्ली: केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये महिलांना असलेली प्रवेशबंदी घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच कोणत्याही भेदभावा शिवाय मंदिरात जाऊन पूजा करण्यास परवानगी देण्याचा आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापिठाने दिला. एका कार्यक्रम उपस्थित केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी याबाबत वक्तव्य करताना म्हंटल आहे की, ‘पूजा करणे माझा अधिकार असला तरी, मात्र अपवित्र करने हा माझा अधिकार नाही. एक मंत्री असल्याच्या नात्याने सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्णया पुढे मी बोलू शकत नाही. परंतु तुम्ही रक्ताने भरलेले सैनिटरी पैड घेऊन आपल्या मैत्रिणीच्या घरी जाल का? जर तुम्ही मासिक पाळीच्या वेळी आपल्या मैत्रिणींच्या घरी जाणे टाळता तर मग तुम्ही ते देवाच्या घरात घेऊन जाण्यासाठी का हट्ट करत आहात?’   ...

डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी मुंबई, दि. ३ : नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. (श्रीमती) मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक ३) डॉ. फडणवीस यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा त्या वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. डॉ. एन. एन. मालदार यांचा  कुलगुरूपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा ... ...

कास्टिंग काऊचमधून महिला खासदारही सुटल्या नाहीत: रेणुका चौधरी नवी दिल्ली: कास्टिंग काऊचबाबत बॉलिवूड कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण प्रतिक्रिया आली आहे ती म्हणजे कॉंग्रेसच्या नेत्या   रेणुका चौधरी यांची. “कास्टिंग काऊच केवळ फिल्म इंडस्ट्रीमध्येच होतं असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी होतं. महिला खासदार यातून सुटलेल्या आहेत असं समजू नये. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित करुन, देशाने एकत्र होणं गरजेचं असून, Me Too अर्था मी सुद्धा पीडित आहे”, असं म्हणायला हवं, असे रेणुका चौधरी म्हणाल्या. दरम्यान, या पूर्वी सरोज खान यांनी “हे प्रकार तर बाबाआदमच्या जमान्यापासून सुरु आहेत. कोणी ना कोणी प्रत्येक मुलीवर हात साफ करण्याचा प्रयत्न करतं. सरकारी खात्यातील लोकही करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्या मागे का लागला आहात? ती किमान रोटी तरी ... ...