समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी 28 हजार कोटींचे कर्ज उपलब्ध, मुख्यमंत्र्यांची घोषणा नागपूर-मुंबई दरम्यानचा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. 55 हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) विविध वित्तीय संस्थांकडून 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या उद्घोषणेवेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अरिजित बसू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एसबीआय कॅप्सचे इव्हीपी सुप्रतिम सरकार आदी मान्यवर उपस्थित होते. ...

पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री   जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. यातून पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल, त्यामुळे हा आराखडा इतरांसाठी ‘रोल मॅाडेल’ ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. या पथकाची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त तथा कोल्हापूर आणि सांगली ... ...

केंद्राचा वाहतूक कायदा : राज्यात तुर्तास अंमलबजावणी नाही- रावते भरमसाठ दंडांचा फेरविचार करण्यासाठी केंद्राला विनंती मुंबई: केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. मात्र, जनतेचा रोष पाहता केंद्र शासनाने लागू केलेल्या दंडवाढीसंदर्भात राज्यात जोपर्यंत राज्य शासनाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत केंद्राने लागू केलेल्या दंडवाढीची राज्यात अंमलबजावणी होणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. वाढीव दंडाबाबत जनतेमध्ये मोठा रोष असून केंद्र शासनाने याचा फेरविचार करावा, तसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेत, अशी मागणी करणारे पत्र आपण बुधवारी (दि.11) केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे, असे त्यांनी ... ...

शरद पवारांची शिष्टाई निष्फळ; उदयनराजे अखेर भाजपमध्ये सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असणाऱ्या संभ्रमाच्या वातावरणावर पडदा पडला आहे. सकाळी राजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पक्षांतर करणार नाहीत, अशी अटकळ व्यक्त होत होती. मात्र ती फोल ठरवत राजे यांनी भाजपात जाण्याच्या निर्णयावर सायंकाळी शिक्कामोर्तब केले. ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी उदयनराजेंनी आज चर्चा केली. त्यानंतर पाच तासांत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार उदयनराजें शनिवारी दि. 14 रोजी दिल्लीस जाऊन खासदारकीचा राजीनामा देतील. रविवारी दि.15 रोजी महाजनादेश यात्रेत समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा होती. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का ... ...

काँग्रेसची गळती चालूच : उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. 'आपण काँग्रेसच्या विचारधारेला मानतो आणि फक्त निवडणुकीपुरता पक्षात आलेलो नाही,' असंही तिने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेताना पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु, सहा महिन्याच्या आतच पक्षातील गटबाजीला कंटाळून तिने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. "माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ... ...

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी; ९ कोटी ६४ लाख घनमीटर काढला गाळ मुंबई, दि १२ :- गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात ९ कोटी ६४ लाख घनमिटर गाळ काढण्यात यश आले आहे. यामुळे ५२७० धरणे स्वच्छ झाली आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. धरणात गाळ सतत साचत राहिल्याने त्यांच्या पाणी साठ्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. २०१४ पासून या योजनेला गती देण्यात आली.धरणातील गाळ काढण्याच्या या उपक्रमामुळे ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. हा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून त्यामुळे १.२५ लाख हेक्टर शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.   ...

औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता मुंबई, दि. 11 : औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन 1 हजार 680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख लोकसंख्येला लाभ मिळणार आहे. मराठवाड्याची जीवनरेखा असणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्यातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते. वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराची लोकसंख्यादेखील वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. यासाठी जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी औरंगाबादला उपलब्ध करुन देण्याच्या पाणीपुरवठा योजनेस मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.   ...